पिंपरी – तुम्ही घेतलेल्या पॉलिसीचे पैसे अकाउंटला प्राप्त झालेले नसून तुमचे पैसे तुम्हाला रिफंड करीत आहोत, असे म्हणून एकाची 39 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. मोबाइलवर आलेला ओटीपी घेऊन एकाची 39 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत विक्रम कुंडलिक पारधे (वय-38, रा. शिवशक्ती नगर देहुरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन 9667044872 या मोबाइलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलधारक आरोपीने फिर्यादी पारधे यांना फोन करुन तुम्ही घेतलेल्या हेल्थकेअर इंडिया या कंपनीच्या पॉलिसीचे पैसे कंपनीच्या अकाउंटला प्राप्त झाले नसून तुमचे पैसे तुम्हाला रिफंड करीत आहोत, असे सांगून फिर्यादीच्या मोबाइलवर आलेला ओटीपी मागितला. हा ओटीपी घेऊन फिर्यादी यांच्या बॅंक खात्यातील 39 हजार 389 रुपये काढून घेऊन फसवणूक केली.