नगर, (प्रतिनिधी) – महसूल आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती आर्थिक संस्था असलेल्या रेव्हेन्यू ॲण्ड रजिस्ट्रेशन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या १५ जागांवर समृद्धी मंडळाचे सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. सोसायटीवर समृद्धी मंडळाने पुन्हा विजयाचा झेंडा फटकविला आहे. आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.१०) मतदान प्रक्रिया पार पडली.
जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रावर ९६ टक्के मतदारांनी मतदानाचा बॅलेट पेपर हक्क बजावला. नगर तहसील कार्यालयात रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी शंभर कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
रेव्हन्यू सोसायटीची स्थापना इंग्रज राजवटीत झाली. जिल्हाधिकारी या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. एकता पॅनलचे १५ आणि समृद्धी पॅनलचे १५ आणि एक अपक्ष अशा ३१ उमेदवारांचा समावेश आहे. मतदानातून सर्वसाधारण- १०, महिला प्रतिनिधी-दोन, अनुसूचित जाती -एक, इतर मागास वर्ग -एक, भटक्या जाती-जमाती -एक या जागांसाठी ही निवडणूक होती. मतदार यादीत एक हजार ४० मतदारांचा समावेश होता. यापैकी ९९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
समृध्दी मंडळाच्या उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे – सर्वसाधारण जागाः- संदीप किसन तरटे -६१५, संतोष उत्तमराव मांडगे -६१३, सुरेश लक्ष्मण राऊत -६१३, राजेश संपतराव घोरपडे -५८८, बाबासाहेब किसन दातखिळे -५८२, गणेश महादेव गर्कळ -५८१, प्रवीण अप्पासाहेब बोरूडे -५७९), प्रदीप जगन्नाथ चव्हाण -५७२, हरिभाऊ परमेश्वर सानप -५६१, विजय सुधाकर हरिश्चंद्रे -५५९, अनुसूचित जाती-जमाती- प्रदीप लक्ष्मण अवचर -५२७, महिला राखीव- वृषाली प्रकाश करोसिया -५५५, सुनंदा साहेबराव मरकड -५९९, इतर मागासवर्गीय- सनी सुभाष जाधव -५४९, भटक्या जाती-जमाती – विकास विष्णू मोराळे -६१७ मते मिळाली आहेत.