मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आमोंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विभागीय शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रप्रमुख काळुराम भवारी आणि मुख्याध्यापिका सरला खराडे यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. प्रशिक्षणास गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी भेट देवून शाळेमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधांचे कौतूक केले. तसेच प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
शाळेत असणाऱ्या शैक्षणिक सुविधा, बोलका वऱ्हांडा, प्रत्येक वर्गात वेगवेगळे तक्ते, संगणक कक्ष, स्वतंत्र वाचनालय, स्वतंत्र प्रयोगशाळा हे सर्व लोकसहभागातून केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी महाजन यांनी ग्रामस्थ आणि शिक्षकांचे कौतूक केले. कार्यक्रमाचे संयोजन भरत सोमवंशी, तुकाराम लेंभे, कविता माकर यांनी केले. राजकुमार गिरी यांनी आभार मानले.