Anant ambani watch price : सोशल मीडिया सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट्सच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या व्हिडिओंनी भरला आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी, आकाश अंबानी, फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन दिसत आहेत. अनंत आणि आकाश अंबानी झकरबर्ग आणि त्यांच्या पत्नीशी गप्पा मारत आहेत. अशात झकरबर्गच्या पत्नीने अनंत अंबानींच्या मनगटावरचे घड्याळ पाहिले आणि त्या हैराणच झाल्या. | ambani pre wedding
व्हायरल व्हिडीओमध्ये अनंत अंबानी झकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला यांना वंताराला विझिट करायला सांगतात. तिने हो म्हणताच तो म्हणाला, मी व्यवस्था करीन. मग प्रिसिला अनंत अंबानींच्या घड्याळाकडे बघते आणि बघतच राहते. तिला हे घड्याळ खूप आवडते. ती घड्याळाची प्रशंसा करते आणि म्हणते- ‘ते घड्याळ विलक्षण आहे.’ खूप छान आहे, व्वा. मग ती विचारते, हे कोणी बनवले? झकरबर्ग मधेच म्हणतात, ‘त्याला घड्याळांचा कधीच शौक नव्हता, पण अनंत अंबानींचे उत्कृष्ट घड्याळ पाहिल्यानंतर त्यांचे मत बदलले. त्यावर चॅनने उत्तर दिले, ‘तुम्हाला माहिती आहे, मला घड्याळ घ्यायचे नव्हते. पण ते पाहिल्यावर वाटले की घड्याळे चांगली आहेत. त्यावर काही वेळ त्यांच्यात चर्चा सुरू होती. | ambani pre wedding
घड्याळाची किंमत किती ?
चॅनने विचारले असता अनंत अंबानी यांनी सांगितले की हे रिचर्ड मिल कंपनीचे घड्याळ आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घड्याळाची किंमत सुमारे 14 कोटी रुपये आहे. एका अहवालानुसार, रिचर्ड मिलचे सर्वात महागडे घड्याळ RM 56-02 Tourbillon Sapphire आहे. त्याची किंमत जवळपास 16.5 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
काय आहे खासियत ?
हे घड्याळ ‘पाटेक फिलिप’चे ‘ग्रँडमास्टर चाइम’ घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत 14 ते 18 कोटी रुपये आहे. या मनगटाच्या घड्याळात रिव्हर्सिबल केस, स्वतंत्र डायल आणि सहा पेटंट इनोव्हेशन्स यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. रिपोर्टनुसार, या स्पेशल एडिशन घड्याळात मौल्यवान हिरे आणि पाचू जडले आहेत. | ambani pre wedding
प्री वेडिंग पार पडले
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा ३ मार्च रोजी संपला. या सोहळ्यात देशातील आणि जगातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या प्री-वेडिंग सोहळ्याला मार्क झकरबर्ग, बिल गेट्ससारखे दिग्गजही आले होते. मुकेश आणि राधिकाचे लग्न जुलैमध्ये होणार आहे.