Yuzvendra Dhanashree Divorce Reason : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाचं सत्य आलं समोर, काय होतं खरं कारण? जाणून घ्या

Yuzvendra Dhanashree Divorce Reason Revealed : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलने नुकताच त्याची पत्नी धनश्री वर्मा हिच्यापासून घटस्फोट घेतला आहे. जवळजवळ लग्नाच्या तब्बला ४ वर्षांनंतर दोघे विभक्त झाले आहेत. मात्र ते गेल्या २ वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते आणि लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांनी त्यांच्यात मतभेद सुरू झाले. धनश्री आणि चहल यांच्या वेगळे होण्यामागील कारण आता उघड झाले आहे. हे ना विवाहबाह्य संबंधांमुळे घडले ना पैशाच्या लोभामुळे. घटस्फोटाबद्दल सत्य काय आहे ते जाणून घ्या.
हे घटस्फोटाचे बनले कारण –
खरंतर, धनश्री आणि युझवेंद्र यांच्या वेगळे होण्यामागील खरे कारण प्रादेशिक दरी असल्याचे म्हटले जाते. मुंबईतील धनश्री आणि हरियाणातील युझवेंद्र चहल यांच्यात दुरावा निर्माण झाला, कारण त्यांच्यात वेगवेगळ्या प्रदेशातील असल्याने सुसंगतता नव्हती. ज्येष्ठ पत्रकार विकी लालवानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
विकी लालवानी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका जवळच्या सूत्राचा हवाला देत लिहिले की, ‘युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे कधीच चांगले जमले नाही. कारण ते पूर्णपणे दोन वेगळे व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती आहेत. अचानक, एके दिवशी दोघांमध्ये वाद आणि भांडण झाले. धनश्रीची इच्छा होती की युजीने त्याच्या बॅगा आणि सामान बांधावे आणि हरियाणाहून मुंबईला शिफ्ट व्हावे.’
हेही वाचा – GT vs PBKS : ‘…म्हणून श्रेयसला शतकासाठी स्ट्राईक दिली नाही’; सामन्यानंतर शशांक सिंगचा मो खुलासा, पाहा VIDEO
चहलला त्याचे घर सोडायचे नव्हते –
त्यांनी पुढे लिहिले की, ‘लग्न झाल्यानंतर चहल आणि धनश्री हरियाणामध्ये युझवेंद्रच्या पालकांसोबत राहायला गेले आणि गरज पडल्यासच मुंबईत आले. या घटस्फोटाचे मुख्य कारण मुंबई-हरियाणा वाद बनला आहे, ज्यामुळे पापाराझी जगात सर्वाधिक चर्चेत असलेले लग्न मोडले. चहलने स्पष्टपणे सांगितले होते की तो स्वतःला त्याच्या पालकांच्या घरापासून आणि त्याच्या परिसरापासून वेगळे होऊ देणार नाही.’





