Yuzvendra Chahal : टी-शर्टवर क्रिप्टिक मेसेज, धनश्री वर्मापासून घटस्फोट, युझीने तुटलेल्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Yuzvendra Chahal’s revelation about divorce : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. २०२० मध्ये धनश्री वर्मासोबत लग्न करणाऱ्या चहलने यंदा घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर चार महिन्यांनी चहलने प्रथमच याबाबत उघडपणे भाष्य केलं. या पॉडकास्टमध्ये त्याने धनश्रीसोबतच्या घटस्फोटाबाबत, त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत आणि त्याच्या मानसिक स्वास्थ्याबाबत मोकळेपणाने बोलला.
घटस्फोटाबाबत चहलचा मोठा खुलासा –
चहलने सांगितलं की, त्यांच्यात आणि धनश्रीमध्ये बराच काळ मतभेद सुरू होते. त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की जोपर्यंत तलाक अंतिम टप्प्यात येत नाही, तोपर्यंत याबाबत कोणालाही काही सांगायचं नाही. त्यामुळे घटस्फोटापूर्वी काही महिने चहल आणि धनश्री सोशल मीडियावर सामान्य जोडप्यासारखेच दिसत होते आणि एकमेकांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत होते. चहल म्हणाला, “आम्ही ठरवलं होतं की घटस्फोट अंतिम होईपर्यंत आम्ही जगाला याबाबत सांगणार नाही.”
धोख्याच्या आरोपांवर चहलचं स्पष्टीकरण –
घटस्फोटाच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली, तेव्हा सोशल मीडियावर काही लोकांनी चहलवर धनश्रीला धोखा दिल्याचा आरोप केला. याबाबत चहल यांनी नाराजी व्यक्त करत सांगितलं, “जेव्हा मी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात होतो, तेव्हा लोकांनी मला धोखेबाज ठरवलं. पण मी कधीच कोणाला धोखा दिला नाही. माझ्यापेक्षा विश्वासू माणूस तुम्हाला सापडणार नाही. मी माझ्या जवळच्या लोकांसाठी मनापासून विचार करतो. मी कधी काही मागितलं नाही, फक्त दिलं आहे.” माझ्या दोन बहिणी आहेत, मला मुलींचा सन्मान कसा करायचा हे माहीत आहे. केवळ कोणासोबत दिसलं म्हणून त्याच्याशी जोडणं चुकीचं आहे.”
क्रिप्टिक टी-शर्टवरही खुलासा –
हेही वाचा – IND vs ENG : कर्णधार गिलच्या चुकीमुळे संघाला बसला मोठा धक्का, चोरटी धाव घेणं पडलं महागात, पाहा VIDEO
मानसिक स्वास्थ्याबाबतही व्यक्त केली भावना –
चहलने आपल्या मानसिक स्वास्थ्याबाबतही बोलताना सांगितलं की, या कठीण काळात त्याने स्वतःला सावरलं आणि आपल्या खास लोकांसाठी नेहमीच विश्वासू राहण्याचा प्रयत्न केला. या पॉडकास्टमुळे चहलच्या चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि त्याच्या भावनांबाबत अधिक माहिती मिळाली.





