CSK vs PBKS : युझवेंद्र चहलची ऐतिहासिक हॅट्ट्रिक: सीएसकेविरुद्ध रचला इतिहास, पाहा VIDEO

Yuzvendra Chahal’s Historic Hat-Trick in CSK vs PBKS match IPL 2025 : आयपीएल २०२४ मधील ४९ व्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना १९.२ षटकांत सर्वबाद १९० धावा केल्या. या सामन्यात युझवेंद्र चहलने हॅट्ट्रिकसह पंजाबसाठी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने आयपीएल २०२५ मधील पहिली हॅट्ट्रिक घेत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध इतिहास रचला आहे. त्याचबरोर अनेक विक्रमही नोंदवले.
युझवेंद्र चहलने सीएसकेविरुद्ध नोंदवला इतिहास
सीएसकेच्या डावातील १९ वे षटक टाकताना युझवेंद्र चहलने आयपीएल इतिहासातील आपली दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. विशेष म्हणजे तो सीएसकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने षटकातील दुसऱ्या चेंडूवर एमएस धोनीला बाद केले. यानंतर त्याने दीपक हुड्डा, नूर अहमद आणि अंशुल कंबोजला यांना तंबूचा रस्ता दाखवत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या तिन्ही विकेट्स त्याने षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर घेतल्या.
𝙒.𝙒.𝙒 🤯
First hat-trick of the season 😍
Second hat-trick of his IPL career 🫡Yuzvendra Chahal is his name 😎
Updates ▶ https://t.co/eXWTTv8v6L #TATAIPL | #CSKvPBKS | @yuzi_chahal pic.twitter.com/4xyaX3pJLX
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025
युझवेंद्र चहलने नोंदवली दुसरी हॅट्ट्रिक –
🎩 Multiple Hat-tricks in IPL History! 🔥
Amit Mishra – 3️⃣ (2008, 2011, 2013)
Yuvraj Singh – 2️⃣ (2009)
Yuzvendra Chahal – 2️⃣ (2022, 2025)
Legends who made the hat-trick club their own! 💥
📷: IPL #IPLHistory #HatTrick #RR #PBKS #YuzvendraChahal pic.twitter.com/NFLdLy5xts
— SportsTiger (@The_SportsTiger) April 30, 2025
युजवेंद्र चहलची आयपीएलमधील ही दुसरी हॅट्रिक आहे. यापूर्वी आयपीएल २०२२ मध्येही त्याने सलग तीन चेंडूत तीन विकेट्स घेतल्या होत्या. तेव्हा तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. त्याने केकेआर विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली होती. तो एकापेक्षा जास्त हॅट्ट्रिक नोंदवणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
हेही वाचा – Glenn Maxwell : पंजाब किंग्जला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू IPL 2025 मधून बाहेर
चहलने हॅटट्रिक घेत मोडले चेन्नईचे कंबरडे –
चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला १९१ धावांचे लक्ष्य दिले आहे. एकेकाळी चेन्नईचा स्कोअर १७२-४ होता. पण यानंतर, चहलने हॅटट्रिक घेत चेन्नईचे कंबरडे मोडले. त्याने एकाच षटकात चार विकेट्स घेतल्या. चेन्नईने शेवटच्या ६ विकेट फक्त १८ धावांत गमावल्या. चेन्नईकडून सॅम करनने ४७ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ८८ धावा केल्या. डेवाल्ड ब्रेव्हिसने ३२ धावांचे योगदान दिले. तर पंजाबकडून चहलने ३ षटकांत ३२ धावा देत ४ बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि मार्को जॉन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.





