US Open 2024 : भांबरी-अल्बानोची तिसऱ्या फेरीत धडक…

US Open 2024(Men’s Doubles) : भारताचा युकी भांबरी (Yuki Bhambri) आणि फ्रान्सचा अल्बानो ऑलिवेट्टी (Albano Olivetti) या जोडीनं पहिला सेट गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत ऑस्टिन क्रॅजिसेक आणि जीन-ज्युलियन रॉजर यांचा पराभव करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली आहे.
दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भांबरी आणि ऑलिवेट्टी या जोडीने अमेरिकेच्या क्राजिसेक आणि नेदरलँडच्या जीन-ज्युलियन रॉजर या 15व्या मानांकित जोडीचा 4-6, 6-3, 7-5 असा पराभव केला. दरम्यान भांबरीने ग्रँड स्लॅम स्पर्धेची तिसरी फेरी गाठण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. याआधी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही त्याने अशीच कामगिरी केली होती.
US Open 2024 : आणखी एक मोठा उलटफेर, गतविजेत्या स्टार टेनिसपटूला तिसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का…
दरम्यान, एकेरीत सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविच अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत उलटफेरचा बळी ठरला आहे. त्याचा 28 व्या मानांकित अलेक्सी पोपिरिनने 6-4, 6-4, 2-6, 6-4 असा पराभव केला. एक दिवस आधी स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराझ दुसऱ्या फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला होता. आता पाठोपाठ जोकोवीच पराभूत झाल्याने स्पर्धेला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे.





