US Open 2024 : आणखी एक मोठा उलटफेर, गतविजेत्या स्टार टेनिसपटूला तिसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का…

US Open 2024 (Novak Djokovic) :– सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविच अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत उलटफेरचा बळी ठरला आहे. त्याचा 28 व्या मानांकित अलेक्सी पोपिरिनने 6-4, 6-4, 2-6, 6-4 असा पराभव केला. एक दिवस आधी स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराझ दुसऱ्या फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला होता. आता पाठोपाछ जोकोवीच पराभूत झाल्याने स्पर्धेला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या 25 वर्षीय पोपिरिनने न्यूयॉर्कमधील आर्थर अशे स्टेडियमवर पहिल्या दोन सेटमध्ये 24 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचचा पराभव करून आघाडी घेतली. त्यानंतर तिसरा सेट 2-6 ने गमावल्यानंतर चौथा सेट 6-4 ने जिंकला. जोकोविच 25 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू होण्याचा प्रयत्न करत होता.
जोकोविच 2017 नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम विजेतेपदाशिवाय यंदाच्या मोसमाची अखेर करणारा खेळाडू ठरला आहे. अमेरिक ओपनच्या चौथ्या फेरीपर्यंतही जोकोविच पोहोचू शकला नसल्याची गेल्या 16 वर्षांतील ही पहिलीच वेळ होती. 2002 नंतर पहिल्यांदाच बिग-3 (जोकोविच, नदाल आणि फेडरर) पैकी कोणीही स्लॅम ट्रॉफी जिंकली नाही.
US Open 2024 : ओसाकाचे आव्हान संपुष्टात; सिनर, स्विटेक तिसऱ्या फेरीत दाखल…
एक दिवस आधी स्पेनचा कार्लोस अल्काराझ दुसऱ्या फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला होता. जागतिक क्रमवारीत 3 व्या क्रमांकावर असलेल्या अल्काराजला जागतिक क्रमवारीत 74 व्या क्रमांकावर नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डी झांडस्कल्पने 6-1, 7-5, 6-4
ने पराभूत केले.





