Swiss Open 2024 (Doubles) : भारताच्या युकी भांबरीने फ्रेंच जोडीदार ऑलिव्हेटसह पटकावले दुहेरीचे विजेतेपद…

Swiss Open 2024 (Doubles) : भारताचा युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिव्हेट यांनी चमकदार कामगिरी करत रविवारी अंतिम फेरीत उगो हंबर्ट आणि फॅब्रिस मार्टिन यांचा पराभव करून स्विस ओपन एटीपी टूर टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भांबरी-ऑलिव्हेट जोडीने जेतेपदाच्या लढतीत हम्बर्ट आणि मार्टिन जोडीचा तीन सेटच्या लढतीत पराभव केला.
Third seeds Yuki Bhambri and Albano Olivetti earned a 6-3, 7-6(4) victory against fifth seeds Sander Arends and Robin Haase to reach the EFG Swiss Open Gstaad final. The duo is into its third tour-level final of the season, having won the Munich title & finished runner-up in Lyon pic.twitter.com/YIfVOHr2mf
— All India Tennis Association (@AITA__Tennis) July 19, 2024
भांबरी आणि ऑलिव्हेट या तिसऱ्या मानांकित जोडीने या एटीपी 250 क्ले कोर्ट स्पर्धेत त्यांच्या फ्रेंच प्रतिस्पर्ध्यांचा 3-6, 6-3, 10-6 असा पराभव केला. अंतिम सामना एक तास आणि सहा मिनिटे चालला ज्यामध्ये दोन्ही जोड्यांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली पण शेवटी भांबरी आणि ऑलिव्हेट जोडीने विजय मिळवला.
Nordea Open 2024 : ऑलिम्पिकपूर्वी नदाल फॉर्ममध्ये परतला, नॉर्दिया ओपनच्या अंतिम फेरीत मारली धडक….
32 वर्षीय भांबरीचे हे तिसरे एटीपी दुहेरी विजेतेपद आहे. या भारतीय खेळाडूने ऑलिव्हेटसह दुसरे विजेतेपद पटकावले. भांबरी 24 जून रोजी दुहेरी क्रमवारीत अव्वल 50 मध्ये पोहोचला होता आणि या विजयामुळे जागतिक क्रमवारीत त्याचे स्थान आणखी सुधारणार आहे. त्याने लॉयड हॅरिससह 2023 मॅलोर्का चॅम्पियनशिपमध्ये त्याचे पहिले एटीपी विजेतेपद जिंकले. भांबरीने ऑलिव्हेटसह या वर्षी एप्रिलमध्ये बीएमडब्ल्यू ओपनचे विजेतेपद पटकावले होते.





