Ajit Pawar : काल ब्रेक आज पुन्हा काम! अजित पवारांना नेमकं काय झालं होतं? कारण आलं समोर; नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम

Ajit Pawar : काल दिवसभर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आयपीएस पोलीस अधिकारी अंजना कृष्णा प्रकरणावर चर्चेत आहेत. विरोधकांकडून त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. काल अजित पवार यांनी आपले सर्व नियोजित दौरे आणि बैठका रद्द केल्या होत्या. यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर त्यांनी बैठका आणि सर्व नियोजित दौरे का रद्द का केले होते याचं कारण समोर आलं आहे.
आजपासून अजित पवार हे पुन्हा एकदा कामात सक्रिय झाले असून आज सकाळपासून मंत्रालयात विविध बैठकांना ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवारांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. याशिवाय अंजना कृष्णा प्रकरणावर रोहित पवारांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत अजित पवार यांची बाजू घेतली. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी अंजना कृष्णा प्रकरणावर अजित पवार यांची पाठराखण करणारी विधाने केली आहेत.
मंत्रालयात बैठकांचा सिलसिला
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी त्यांच्या नियोजित बैठका आणि दौरे का रद्द केले होते, याबाबत अजित पवार यांच्या कार्यालयाने माहिती दिली आहे. अजित पवार हे आजारी असून त्यांना पुन्हा एकदा घशाचा त्रास जावणत असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता त्यांना बर वाटत असून आजपासून ते पुन्हा एकदा कामात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.





