Maharashtra Politics : येवला शहर आणि तालुक्यात मनसेला मोठा धक्का बसला असून, शहर उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हा प्रवेश माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. (Maharashtra Politics) मनसेचे शहर उपाध्यक्ष अक्षय पंडोरे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी येवला येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics) यावेळी बोलताना समीर भुजबळ यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, युवकांच्या बळावर पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. “राष्ट्रवादी काँग्रेस ही सर्वसामान्यांसाठी काम करणारी पक्षसंस्था आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी सक्रिय भूमिका घ्यावी,” असे त्यांनी सांगितले. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics) समीर भुजबळांकडे येवला नेतृत्वाची धुरा? दरम्यान, येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी समीर भुजबळ यांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. नगरपालिका निवडणुकीपासून त्यांनी संघटनावर लक्ष केंद्रित केले असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांनी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आणि पक्षाला यश मिळवून दिले. त्यामुळे भविष्यात येवला मतदारसंघाचे नेतृत्व समीर भुजबळ यांच्याकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)