NCP News : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाचा संघर्ष तीव्र होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. (NCP News) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर काही कालावधीतील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले होते. या निर्णयामुळे पक्षांतर्गत वाद अधिकच चिघळल्याचे सांगितले जाते. दिल्ली दौऱ्यादरम्यान पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अंतर ठेवले, यामुळेही मतभेद अधोरेखित झाले. (NCP News) दरम्यान, पार्थ पवार यांनी पटेल आणि तटकरे यांची प्रशंसा करणारे पत्रक जरी काढले असले, तरी त्यामागे वेगळे राजकीय संकेत असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणाऱ्या नरेश अरोरा यांच्या ‘डिझाइन बॉक्स’ कंपनीला दिलेले काम अचानक काढून घेण्यात आले. हा निर्णयही पटेल-पार्थ वादातूनच घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (NCP News) पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये पार्थ पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी वाढताना दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी ठरवताना पार्थ यांनी सुचवलेल्या नावाला विरोध झाला आणि अखेर माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली. (NCP News) तसेच, काही जिल्ह्यांतील कार्यक्रमांमध्ये पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या छायाचित्रांचा अभाव दिसून आल्यानेही पक्षातील गटबाजी उघड झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. (NCP News)