Top 10 Small Cap Funds of 2023: स्मॉल कॅप फंड अधिक जोखमीचे मानले जाऊ शकतात, परंतु ते परतावा देण्यामध्ये उत्कृष्ट आहेत. 2023 मध्ये आतापर्यंतच्या कामगिरीवरून ते दिसून येते. 2023 या वर्षात, स्मॉल कॅपवर केंद्रित असलेल्या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या सदस्यांना जबरदस्त परतावा दिला आहे.
किमान 25% परतावा –
उपलब्ध आकडेवारीनुसार, 2023 मध्ये आतापर्यंतच्या कामगिरीच्या दृष्टीने सर्वोत्तम स्मॉल कॅप फंडाने 56 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या श्रेणीतील किमान 4 फंडांनी आतापर्यंत 50-50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, स्मॉल कॅप श्रेणीमध्ये असा एकही फंड नाही ज्याचा 2023 साठीचा वार्षिक परतावा 25 टक्क्यांपेक्षा कमी असेल. याचा अर्थ 2023 मध्ये प्रत्येक स्मॉल कॅप फंडाने किमान 25% परतावा दिला आहे.
सध्या 14 डिसेंबरपर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्या बाजारात 27 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत, ज्यांच्या व्यवस्थापनाखालील एकत्रित मालमत्ता 2.20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यापैकी 20 हून अधिक फंड योजना 30-30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
बेंचमार्कच्या तुलनेत तिप्पट परतावा –
बुधवारी (20 डिसेंबर) रोजी बाजारात मोठी घसरण दिसून आली. बुधवारी सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी घसरला आणि 70,500 अंकांच्या जवळ बंद झाला. त्यानंतरही सेन्सेक्स या वर्षात आतापर्यंत 15.27 टक्के नफ्यात आहे. या वर्षात सेन्सेक्सने आतापर्यंत 10 हजार अंकांची वाढ नोंदवली आहे. तर NSE निफ्टी 50 चा वर्षभराचा परतावा 16.23 टक्के आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, टॉप-10 स्मॉल कॅप फंडांनी या वर्षी आतापर्यंत सेन्सेक्स-निफ्टीच्या तुलनेत जवळजवळ तिप्पट परतावा दिला आहे.
2023 चे 10 सर्वोत्कृष्ट स्मॉल कॅप फंड (YTD रिटर्न):
– महिंद्रा मॅन्युलाइफ स्मॉल कॅप फंड: 56.30%
– बंधन स्मॉल कॅप फंड: 52.16%
– फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड: 51.18%
– ITI स्मॉल कॅप फंड: 50.73%
– निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड: 47.05%
– HSBC स्मॉल कॅप फंड: 46.60%
– इन्वेस्को इंडिया स्मॉल कॅप फंड: 44.81%
– ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप इंडेक्स फंड: 44.64%
– सुंदरम स्मॉल कॅप फंड: 44.55%
– HDFC स्मॉल कॅप फंड: 44.18%
स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय ?
स्मॉल कॅप म्युच्युअल फंड अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांचे समभाग हे बाजार भांडवलानुसार शेअर बाजारामधील अव्वल २५० कंपन्यांच्या समभागांच्या खाली असतात. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड त्यांच्या उच्च परताव्यामुळे लोकप्रिय गुंतवणूक पर्याय ठरले आहेत. तुमचा समभाग पोर्टफोलिओ कसा असावा हे ठरवताना तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक करता त्या कंपनीचे बाजार भांडवली मूल्य काय आहे हे जाणणे आवश्यक आहे.
बाजार भांडवलाच्या दृष्टीने अव्वल २५० कंपन्यांव्यतिरिक्त सर्व कंपन्यांमध्ये स्मॉल कॅप फंड गुंतवणूक करतात. इतर समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडांच्या तुलनेत हे फंड तुलनेने जोखीमयुक्त आणि कमी ते मध्यम मुदतीत अस्थिर आहेत. असे असले तरी ते दीर्घ मुदतीत उच्च परताव्याच्या दृष्टीने उपयुक्त मानले जातात. तथापि, बाजारातील बहुतेक गुंतवणुकीप्रमाणे, जोखीम नेहमीच गुंतवणुकीला असली तरी या कंपन्यांचे शेअर्स हा काहीसा अपवाद केल्यास अल्प कालावधीत दुप्पट किंवा तिप्पट वाढू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये थोडेसे सर्वोत्कृष्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांच्याकडून मिळू शकणारा उच्च परतावा तुम्ही गमावणार नाही.
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून, पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या. dainikprabhat.com कधीही कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.