Maharashtra Politics : मोठी बातमी..! भास्कर जाधव भाजपात जाणार?; भाजपा आमदाराची थेट ऑफर
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे वारे वाहत असतानाच आता कोकणातून एक अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर येत आहे.

Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले असतानाच आता भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमानंतर बोलताना जठार यांनी, “कोकणला तुमची गरज आहे, तुम्ही आमच्यासोबत या,” असे म्हणत भास्कर जाधव यांचे कौतुक केले. (Maharashtra Politics)
चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमोद जठार आणि भास्कर जाधव एकाच व्यासपीठावर आले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना जठार म्हणाले की, भास्कर जाधव हे राज्यातील अनुभवी नेते असून त्यांच्या क्षमतेचा योग्य वापर होत नाही. उद्धव ठाकरे गटात त्यांना अपेक्षित जबाबदारी मिळत नसल्याचा दावा करत त्यांनी, “भास्कर जाधव यांची सत्तेत गरज आहे,” असे वक्तव्य केले. (Maharashtra Politics)
यावेळी त्यांनी भविष्यातील राजकीय संकेत देणारे वक्तव्यही केले. “आज आम्ही दोघांनी एकत्र झाड लावले आहे, ते झाड भविष्यात चांगली फळे देईल,” असे म्हणत जठार यांनी सूचक टिप्पणी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
जठार-जाधवांची गळाभेट चर्चेत
काही महिन्यांपूर्वी प्रमोद जठार आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. गुहागरमधील स्वच्छता अभियानावेळी जठार यांनी जाधवांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. तसेच लोटे एमआयडीसीच्या दौऱ्यात “मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव असले तरी एमआयडीसीचा पालक आमदार मी आहे,” असेही त्यांनी म्हटले होते. (Maharashtra Politics)
मात्र, या सर्व वादानंतर चिपळूणमधील कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी प्रमोद जठार यांनी “मिले सुर मेरा तुम्हारा” अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील बदललेले राजकीय समीकरण आणि जठार यांनी दिलेली खुली ऑफर सध्या कोकणासह राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. (Maharashtra Politics)






