WTT Champions 2024 : मनिका बत्राचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात….

WTT Champions Montpellier 2024 : भारताची स्टार महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा WTT चॅम्पियन्स स्पर्धेतील प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपला. मनिकाला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या कियान तियानीविरुद्ध (Manika Batra vs Qian Tianyi) सरळ गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
या स्पर्धेत मनिकाकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, परंतु जागतिक क्रमवारीत तीसव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय खेळाडूला तियानीविरुद्ध अवघ्या 25 मिनिटांत 8-11, 8-11, 10-12 असा पराभव स्वीकारावा लागला.
🏓 𝗘𝗻𝗱 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮’𝘀 𝗰𝗮𝗺𝗽𝗮𝗶𝗴𝗻! Manika Batra’s 0-3 defeat to 🇨🇳’s Qian Tianyi in the Women’s Singles quarter-final, ended India’s campaign in the WTT Champions.
📸 Pics belong to the respective owners • #ManikaBatra #WTTChampions #IndianTableTennis #Sportwalk pic.twitter.com/044Xq7fqAt
— Sportwalk Media (@sportwalkmedia) October 27, 2024
राष्ट्रकुल स्पर्धेत अनेक पदके जिंकणाऱ्या मनिकाने तिन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्याला चांगली झुंज दिली, मात्र चीनच्या खेळाडूने महत्त्वाच्या क्षणी गुण मिळवत चांगली कामगिरी करत विजयाची नोंद केली.
डब्ल्यूटीटी (WTT) चॅम्पियन्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय असलेल्या मनिकाने शुक्रवारी जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानी असलेल्या रोमानियाच्या बर्नाडेट जॉक्सचा 11-9, 6-11, 13-11, 11-9 असा पराभव करून अंतिम आठमध्ये (उपांत्यपूर्वफेरी) प्रवेश केला होता. दुसरीकडे तियानीने प्री-क्वार्टर फायनलमध्ये उलटफेर करत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील आणि अव्वल मानांकित देशबांधव यिदी वांगचा 11-7, 11-9, 13-11 असा पराभव करत आगेकूच केली होती.





