UTT 2024 : अल्टीमेट टेबल टेनिस लीगचे मनिका बत्राने केले कौतुक, म्हणाली “या स्पर्धेचा फायदा…”

Ultimate Table Tennis Tournament 2024 :- जगभरातील खेळाडूंना आकर्षित करणाऱ्या अल्टिमेट टेबलटेनिस सारख्या स्पर्धांचे आयोजन होत असल्याने भारतीय टेबलटेनिस योग्य दिशेने जात असल्याचे मत भारताची टेबलटेनिसपटू मनिका बत्रा हिने व्यक्त केले.
आज चेन्नई येथे अल्टिमेट टेबलटेनिस स्पर्धेत ती बेंगळुरू स्मॅशर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी तिने पत्रकारांशी संवाद साधला. अशा स्पर्धांमुळे अनेक देशातून खेळाडू येतात. यामुळे आम्हाला देखील त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळते. यापूर्वी देखील युटीटीमध्ये खेळल्याचा फायदा झाला असल्याचे मनीकाने सांगितले.
भारतामध्ये महिला खेळाडू देखील मोठ्या संख्येने या खेळात येत असल्याने आम्हाला देखील चांगले वाटते. अशा स्पर्धातून खेळल्याने अनुभव वाढत असल्याचे मनिकाने सांगितले. दरम्यान, ३३ व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मनिकाला जपानच्या मिऊ हिरानोकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता.





