Paris Olympics 2024 (TableTennis) : महिला एकेरीत मनिका बत्राचे आव्हान संपुष्टात …

Paris Olympics 2024 (Table Tennis,Manika Batra) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राचे एकेरी टेबल टेनिस स्पर्धेतील आव्हान आता संपले आहे. ती आता या ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीत दिसणार आहे. जपानच्या मिऊ हिरानोने प्री-क्वार्टर फायनलमध्ये मनिका बत्राचा 4-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट बुक केले आहे. पराभवानंतरही मनिका बत्राने उप-उपांत्यपूर्व फेरी गाठून इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये राऊंड ऑफ 16 ची फेरी गाठणारी ती पहिली भारतीय ठरली.
🇮🇳Result Update: #TableTennis🏓 Women’s Singles Round of 16👇🏻
Our star paddler @manikabatra_TT is out of #ParisOlympics2024 Women’s Individual event in the last 16 stage.
The 29-year-old had a close encounter with Japan’s Hirano Miu across the match but she eventually lost… pic.twitter.com/CPRYdnNBnP
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
जपानच्या हिरानोने पहिला गेम 11-6 असा जिंकला. दुसरा गेम 11-9 असा जिंकला. मनिकाने तिसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत 14-12 असा विजय मिळवला. यानंतर हिरानोने पुढचा म्हणजे चौथा गेम 11-8 असा तर पाचवा गेम 11-6 असा जिंकत विजय मिळवला.
मनिका बत्राने राऊंड ऑफ 32 फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या 12व्या मानांकित प्रितिका पावडेचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. मनिकाने पावडेचा 11-9, 11-6, 11-9, 11-7 असा पराभव केला होता. मनिकाने याआधीच टेबल टेनिस स्पर्धेची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठून ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.





