Paris Olympics 2024 (Women’s Table Tennis) : ऐतिहासिक विजयासह टीम इंडियानं उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक….

Paris Olympics 2024 (Table Tennis) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील महिला टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भारतीय महिला संघाने राउंड ऑफ 16 फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाचा संघ रोमानियाचा (India beat Romania) पराभव करत या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला टेबल टेनिस संघ ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघापुढे आता पुढील फेरीत युनायटेड स्टेट्स आणि जर्मनी यांच्या होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल. हा सामना 6 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
11व्या मानांकित भारताने रोमानियाविरुद्ध चांगली सुरुवात केली. पहिले दोन सामने जिंकून त्यांनी 2-0 अशी आघाडी घेतली. यानंतर रोमानियाने दोन सामने जिंकले आणि गुणसंख्या 2-2 अशी बरोबरी झाली. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात, जबाबदारी मनिका बत्रावर (Manika Batra) होती आणि तिने निराश केले नाही. तिने पाचव्या सामन्यात एडिना डियाकोनूचा पराभव करून भारताला 3-2 ने पुढे केले, जे उपांत्यपूर्व फेरी खेळण्यासाठी आवश्यक होते.
Women’s Team Round of 16 👇🏻#TableTennis🏓
The Indian🇮🇳 team consisting of Manika Batra, Sreeja Akula, and Archana Kamath defeats Romania 3-2 to advance to the Quarter-Finals.
Take a look at the results:
Sreeja/Archana defeated Adina Diaconu/Elizabeta Samara 11-9, 12-10,… pic.twitter.com/T7TsPOA957
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2024
श्रीजा-अर्चना यांनी दिली आघाडी…
श्रीजा अकुला आणि अर्चना कामथ यांनी सुरुवातीपासूनच रोमानियन संघावर दबाव आणला. भारतीय महिला संघाने रोमानियाच्या एडिना डायकोनू आणि एलिझाबेथ समारा यांचा 11-9, 12-10, 11-7 असा पराभव केला. भारतीय संघ एका वेळी 6-8, 7-9 असा पिछाडीवर होता, पण त्याने पुनरागमन करत गेम जिंकला. अदिना डायकोनू आणि एलिझाबेथ समारा या जोडीने तिसऱ्या गेममध्ये 6-4 अशी आघाडी घेतली पण भारताने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत विजय मिळवला.
मनिका बत्राने जिंकला दुसरा सामना..
भारत विरुद्ध रोमानिया महिला सांघिक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मनिका बत्रा आणि बर्नाडेट स्जॉक्स यांच्यात स्पर्धा होत आहे. भारतीय पॅडलर मनिकाने पहिला गेम 11-5 असा जिंकला. यानंतर तिने दुसरा गेम 11-7 असा जिंकला. तिसऱ्या गेममध्येही मनिकाची उत्कृष्ट कामगिरी कायम राहिली आणि तिने तिसरा गेमही 11-7 असा जिंकून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
श्रीजाला एकेरीत पराभवाचा धक्का…
भारत-रोमानिया महिला सांघिक स्पर्धेतील तिसरा सामना एकेरीचा होता. या सामन्यात श्रीजा अकुलाचा सामना एलिझाबेथ समाराशी झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा होती. अखेर हा सामना रोमानियाने जिंकला. एलिझाबेथ समाराने रोमानियासाठी 8-11, 11-4, 7-11, 11-6, 11-8 असा सामना जिंकून संघाला पुनरागमन करून दिले. तेव्हा भारत 3 सामन्यांनंतर 2-1 ने आघाडीवर होता.
अर्चनाही एकेरीत पराभूत…
सांघिक स्पर्धेतील चौथ्या लढतीतील तिसऱ्या एकेरीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या अर्चना कामथला रोमानियाच्या बर्नाडेट स्झोक्सकडून 5-11, 11-8, 7-11, 9-11 असा पराभव पत्करावा लागला. या विजयासह रोमानियाने 2-2 अशी बरोबरी साधली होती.
निर्णायक सामन्यात मनिकाची दमदारी कामगिरी…
लढतीत 2-2 अशा बरोबरीनंतर भारताची सर्व जबाबदारी माणिक बत्रावर होती, जी दुस-यांदा एकेरीच्या सामन्यात भाग घेत होती. यावेळी तिचा सामना एडिना डायकोनूशी झाला. मनिकाने पहिला गेम सहज जिंकला, पण पुढील दोन गेम जिंकण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली असली तरी तिने हार मानली नाही आणि अखेरीस मनिकाने हा सामना 11-5, 11-9, 119 असा जिंकून भारताला 3-2 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली आणि संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले.





