Paris Olympics 2024 (Table Tennis) : भारतीय महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर…

Paris Olympics 2024 (Table Tennis) : पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील भारताची टेबल टेनिस मोहीम बुधवारी महिला संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून पराभूत झाल्यामुळे संपुष्टात आली आहे. मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामथ यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाला रिओ 2016 रौप्यपदक विजेत्या जर्मनीकडून 1-3 ने पराभव पत्करावा लागला आहे. त्याआधी ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सांघिक स्पर्धांमध्ये भाग घेणारा भारतीय पुरुषांचा संघ देखील प्राथमिक फेरीतच चीनच्या पीपल्स रिपब्लिककडून पराभूत झाला.
श्रीजा अकुला आणि अर्चना या भारतीय जोडीला पहिल्या दुहेरीच्या लढतीत युआन वान आणि झिओना शान यांच्या जोडीकडून 5-11 11-8 10-12 6-11 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारताची स्टार खेळाडू मनिका बत्रा पहिल्या एकेरीत ऍनेट कॉफमनविरुद्ध तिच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसली नाही. तिने पहिला गेम जिंकला पण पुढचे तीन गेम गमावले आणि 11-8 5-11, 7-11, 5-11 असा सामना गमावला. यासह जर्मन संघाने 2-0 अशी आघाडी घेतली.
The Indian #TableTennis team🇮🇳 consisting of Manika Batra, Sreeja Akula and Archana Kamath give a tough fight before going down to Germany🇩🇪 by a 1-3 scoreline.
Take a look at the results!👇🏻
Sreeja Akula / Archana Kamath lost to Yuan Wan/ Xiaona Shan 5-11, 11-8, 10-12, 6-11.… pic.twitter.com/iFYU4nbngG
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2024
यानंतर अर्चनाने भारताला आशेचा किरण दाखवला. दुसऱ्या एकेरीत तिने झिओना शानवर 19-17, 1-11, 11-5, 11-9 असा विजय मिळवला.यानंतर तिसऱ्या एकेरीत कॉफमनने श्रीजाचा 11-6, 11-7, 11-7 असा पराभव करत जर्मनीला विजय मिळवून दिला आणि उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करत भारताच्या आशेवर पाणी फेरले.
तत्पूर्वी, भारतीय महिला संघाने सोमवारी उत्कंठावर्धक लढतीत उच्च मानांकित रोमानियाचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिलांच्या टेबल टेनिस सांघिक स्पर्धांचे पदार्पण झाले होते. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत प्रथमच सांघिक स्पर्धेत सहभागी झाला होता.





