WTC Final 2023 : संघ निवडीसाठी ICC कडून अखेरची तारीख जाहीर, Team India ची ‘या’ महिन्यात होणार निवड

मुंबई – आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. याबाबत आयसीसीने 7 मे ही अखेरची तारीख जाहीर केली असून त्यापूर्वी संघ निवड करावी लागणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून पहिल्या मौसमात न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. यावेळी अंतिम लढत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर येत्या 7 ते 11 जून या कालावधीत होणार असून या सामन्यासाठी एक जादा दिवस ठेवण्यात आला आहे.
#INDvAUS 1st ODI : शमी-सिराजची घातक गोलंदाजी, ऑस्ट्रेलिया संघ 188 धावांवर गारद
त्यातच या कालावधीत इंग्लंडमध्ये पावसाळा असल्याने सामना का आयोजित केला जात असल्याची टीका आता सुरू झाली असून आयसीसीने वेळापत्रकात तसेच सामन्याच्या ठीकाणात बदल होणार नसल्याचे जाहीर करत या टीकांना पूर्णविराम दिला आहे.





