Hockey India : हॉकी इंडियाची राष्ट्रीय शिबिरासाठी 39 संभाव्य खेळाडूंची घोषणा

नवी दिल्ली :- हॉकी इंडियाने आगामी राष्ट्रीय शिबिरासाठी भारताच्या 39 संभाव्य खेळाडूंची घोषणा केली. हे खेळाडू बंगळुरू येथील साई केंद्रात येत्या 19 जुलैपर्यंत सराव करतील.
यानंतर भारताचा हॉकी संघ स्पेनमध्ये 25 ते 30 जुलैदरम्यान स्पॅनिश हॉकी फेडरेशनच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत इंग्लंड, नेदरलॅंड्स आणि स्थानिक संघाशी सामने खेळेल. या चार देशांच्या स्पर्धेनंतर आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा चेन्नई येथे 3 ऑगस्टपासून होत आहे.
यंदाच्या मोसमात भारताच्या हॉकी संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे असल्याने या शिबिराला महत्त्व प्राप्त
झाले आहे.
हॉकी संघातील संभाव्य खेळाडू :-
कृष्ण बहादुर, श्रीजेश, सूरज, पवन, प्रशांत, जरमनप्रीत, सुरेंदर, हरमनप्रीत, वरुण, अमित, गुरिंदर, जुगराज, मंदीप, नीलम संजीप, संजय, यशदीप, दिपसान, मंजीत, मनप्रीत, हार्दिक, विवेक सागर, रबीचंद्र, शमशेर, नीलकंठ, राजकुमार, सुमित, आकाशदीप, गुरजंत, राहिल, मनिंदर, कार्थी, मनदीप सिंह, अभिषेक, दिलप्रीत, सिमरनजीत, सुखजीत, ललित, शिलानंद, राजभर.





