#INDvWI Test Series : संघ निवडीची ‘रोहित शर्मा’ला डोकेदुखी
Updated On:

जमैका :- वेस्ट इंडीजमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने सरावही सुरू केला आहे. आता या दोन संघातील पहिला कसोटी सामना येत्या 12 जुलैला सुरु होणार आहे. मात्र, आता भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याची डोकेदुखी वाढणार आहे.
कसोटीत सलामीला ईशान किशनला फलंदाजीची संधी द्यायची की श्रीकर भरतला या विवंचनेत आता तो अडकणार आहे.
अंतिम संघ निवड करताना यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणाला प्राधान्य द्यायचे याबाबतही रोहितला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी सल्लामसलत करावी लागणार आहे.
भरत तसा नवखा असून त्याने देशांतर्गत स्पर्धेतही फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्यामानाने इशानकडून करण्यात आलेल्या अपेक्षा त्याने बऱ्याच अंशी पूर्ण केल्या आहेत.





