WTC Final 2025 : कागिसो रबाडाचा विक्रमी धमाका; डब्ल्यूटीसी फायनलमध्ये डोनाल्डला टाकलं मागं!

WTC Final 2025 Kagiso Rabada Breaks Allan Donald’s Record : डब्ल्यूटीसी २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने पाच विकेट्स घेत अॅलन डोनाल्डचा विक्रम मोडला. रबाडाने आता दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज बनला आहे. रबाडाच्या नावावर आता दक्षिण आफ्रिकेसाठी ३३२ विकेट्स आहेत. तर डोनाल्डने दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत ३३० विकेट्स घेतल्या होत्या.
लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रबाडाने १५.४ षटकांत ५१ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. रबाडाच्या या धारदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ २१२ धावांवर ऑलआउट झाला. यासह रबाड लॉर्ड्सवर सर्वाधिक विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज बनला. त्याने मोर्ने मॉर्केलला मागे टाकत ही कामगिरी केली आहे. यासह रबाडा दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
Look at that average 🔥🇿🇦🏏 #KagisoRabada pic.twitter.com/wie7Ry526W
— Gills (@gpricey23) June 11, 2025
- डेल स्टेन – ४३९
- शॉन पोलॉक – ४२१
- मखाया एनटिनी – ३९०
- कागिसो रबाडा – ३३२
- अॅलन डोनाल्ड – ३३०
या अंतिम सामन्यात, रबाडाने सातव्या षटकात उस्मान ख्वाजा (२० चेंडूत ०) ला बाद करून आपल्या विकेट्सटे खाते उघडले. यानंतर त्याच षटकात कॅमेरुन ग्रीन (३ चेंडूत ४) ची विकेट घेतली. चहापानानंतरच्या सत्रात, त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला १ धावेवर क्लीन बोल्ड केले आणि नंतर अष्टपैलू ब्यू वेबस्टरला स्लिपमध्ये झेलबाद केले. वेबस्टरच्या रूपात पहिल्या डावातील त्याची चौथी विकेट घेऊन, ज्याने ९२ चेंडूत ७२ धावा केल्या, रबाडाने अॅलन डोनाल्डला मागे टाकले. त्यानंतर त्याने स्टार्कला बाद करून आपले विकेट्सचे पंचक पूर्ण केले.
हेही वाचा – WTC Final 2025 : स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास; अजिंक्य रहाणेला मागे टाकत बनला नंबर वन!





