Cooper Connolly : २२ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूने रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

कूपर कॉनोलीचा ऐतिहासिक पराक्रम –
या सामन्यात कूपर कॉनोलीने उत्कृष्ट गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चारीमुंड्या चीत केले. त्याने 6 षटकांत केवळ 22 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आणि सामन्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वयाच्या 22 वर्षे आणि 2 दिवसांत त्याने हा पराक्रम करत क्रेग मॅकडरमॉट यांचा 1987 मध्ये (22 वर्षे 204 दिवस) केलेला विक्रम मोडला. यापूर्वी मिचेल स्टार्कने 2012 मध्ये 22 वर्षे 211 दिवसांत 5 विकेट्स घेतले होते.
𝘼 𝙣𝙚𝙬 𝙘𝙚𝙡𝙚𝙗𝙧𝙖𝙩𝙞𝙤𝙣 is in the market 🏹#CooperConnolly #AUSvsSA pic.twitter.com/z2cybrV5Qy
— CricTracker (@Cricketracker) August 24, 2025
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 5 विकेट्स घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज:
- 22 वर्षे 2 दिवस – कूपर कॉनोली विरुद्ध दक्षिण आफ्रिका – मॅके, 2025
- 22 वर्षे 204 दिवस – क्रेग मॅकडरमॉट विरुद्ध पाकिस्तान – लाहोर, 1987
- 22 वर्षे 211 दिवस – मिचेल स्टार्क विरुद्ध पाकिस्तान – शारजाह, 2012
ऑस्ट्रेलियाचा 276 धावांनी दणदणीत विजय –
Maiden five-wicket haul for Cooper Connolly! #AUSvsSA #CooperConnolly pic.twitter.com/DxvMtaYYMa
— CricTracker (@Cricketracker) August 24, 2025
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 4 बाद 431 धावांचा डोंगर उभा केला. ट्रॅव्हिस हेडने 142, मिचेल मार्शने 100, कॅमरॉन ग्रीनने 118 आणि अॅलेक्स कॅरीने 50 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 24.5 षटकांत 155 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 276 धावांनी जिंकला, जो वनडे क्रिकेटमधील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. मात्र, तीन सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-1 ने जिंकली. या सामन्याने ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूंची क्षमता आणि दमदार कामगिरी जगासमोर आली, विशेषत: कूपर कॉनोलीच्या विक्रमी गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले.





