AUS vs SA : कॅमेरॉन ग्रीनने मोडला १९ वर्षांचा विक्रम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले सर्वात जलद शतक

Cameron Green 2nd Fastest ODI century for Australia : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया 276 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकाने 2-1 अशा फरकाने खिशात घातली. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात 47 चेंडूंमध्ये शतक ठोकून इतिहास रचला.
कॅमेरॉन ग्रीनने रचला इतिहास –
या खेळीच्या जोरावर तो ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. याच सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम मॅथ्यू हेडनच्या नावावर होता, ज्याने 2006 मध्ये 66 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद शतकाचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे, ज्याने 2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
Cameron Green smashed the second-fastest ODI century for Australia in the 3rd ODI against South Africa in Mackay 💯👏#CameronGreen #GlennMaxwell #AUSvSA #CricketTwitter pic.twitter.com/opWu24K9tK
— InsideSport (@InsideSportIND) August 24, 2025
ग्रीनने 55 चेंडूंमध्ये साकारली 118 धावांची खेळी –
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि 50 षटकांत 2 बाद 431 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये कर्णधार मिचेल मार्शने 106 चेंडूंमध्ये 100 धावा, ट्रॅव्हिस हेडने 103 चेंडूंमध्ये 142 धावा आणि कॅमरॉन ग्रीनने 55 चेंडूंमध्ये 118 धावांची खेळी केली. ग्रीनच्या या तडाखेबंद खेळीत 8 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. मार्श आणि हेड यांनी पहिल्या विकेटसाठी 250 धावांची दमदार भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला भक्कम पाया रचून दिला.
हेही वाचा – AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! द. आफ्रिकेचा धुव्वा उडवत नोंदवला वनडेतला दुसरा सर्वात मोठा विजय
दक्षिण आफ्रिकेचा केवळ 155 धावांवर आटोपला –
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 24.5 षटकांत केवळ 155 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 276 धावांनी जिंकत मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते. कॅमरॉन ग्रीनच्या या शतकाने त्याने मॅथ्यू हेडनचा विक्रम मोडला, तर युसूफ पठाण (68 चेंडू), अब्दुल रझाक (70 चेंडू) आणि रिकी पॉन्टिंग (71 चेंडू) यांना मागे टाकत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात जलद शतकाचा मान पटकावला.





