Kagiso Rabada Record : कगिसो रबाडाचा पॉवरप्लेमध्ये धुमाकूळ! लसिथ मलिंगाला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा दुसराच विदेशी खेळाडू
Kagiso Rabada Record : २० एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात रबाडाने पॉवरप्लेमध्येच मुंबईच्या तीन दिग्गज फलंदाजांना बाद करून श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा याचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

Kagiso Rabada IPL Powerplay Record 2026 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात कगिसो रबाडाने नव्या चेंडूने कहर केला. मुंबई इंडियन्सच्या टॉप ऑर्डरला त्याने स्थिरावण्याची संधीच दिली नाही. या प्रभावी स्पेलमुळे रबाडा आता आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये (१ ते ६ षटके) सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा परदेशी गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने लसिथ मलिंगाचा ३७ विकेट्सचा विक्रम मागे टाकत आता ३८ विकेट्सचा टप्पा गाठला आहे.
विदेशी वेगवान गोलंदाजांचे पॉवरप्लेमधील रेकॉर्ड –
या यादीत राजस्थान रॉयल्सचा ट्रेंट बोल्ट ७२ बळींसह अव्वल स्थानी आहे. रबाडाने मलिंगाला मागे टाकल्याने आता क्रमवारी खालीलप्रमाणे झाली आहे:
- ट्रेंट बोल्ट: ७२ विकेट्स
- कगिसो रबाडा: ३८ विकेट्स
- लसिथ मलिंगा: ३७ विकेट्स
- मोर्ने मोर्केल: ३६ विकेट्स
आयपीएल २०२६ मधील कामगिरी –
Kagiso Rabada brings the thunder ⚡
Every wicket delivered at serious pace 🔥#Cricket I #IPL2026 I #KagisoRabada pic.twitter.com/uoYrPPrKeg
— CricTracker (@Cricketracker) April 20, 2026
चालू हंगामातही रबाडा पॉवरप्लेमध्ये ‘विकेट टेकर’ ठरला आहे. ६ सामन्यांत त्याने पॉवरप्ले दरम्यान ७ बळी घेतले आहेत. या शर्यतीत राजस्थानचा जोफ्रा आर्चर (६ विकेट्स), लखनऊचा प्रिन्स यादव आणि आरसीबीचा जॅकब डफी (प्रत्येकी ५ विकेट्स) हे रबाडाच्या मागे आहेत.
मुंबईचे २०० धावांचे आव्हान –
Quinton de Kock ✅
Surya Kumar Yadav ✅Kagiso Rabada with a fine piece of new-ball bowling 👌
Updates ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI | @gujarat_titans pic.twitter.com/Xw2QlE4kZF
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
कगिसो रबाडाच्या धक्क्यातून सावरत मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला आहे. मुंबईचा युवा स्टार तिलक वर्मा याने ४५ चेंडूंत झळकावलेले झंझावाती शतक मुंबईसाठी तारणहार ठरले. आता गुजरात टायटन्स रबाडाच्या या ऐतिहासिक कामगिरीला विजयाचे स्वरूप देणार की मुंबईचे गोलंदाज हे आव्हान राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





