WTC 2025 Final : रबाडाचा भेदक मारा; एकाच षटकात ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज गारद! पाहा VIDEO

WTC 2025 Final AUS vs SA 1st Day Updates : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका लॉर्ड्सच्या मैदानावर आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना बाद करत मोठा धक्का दिला. त्यानी दोन्ही फलंदाजांनी स्लिपमध्ये झेलबाद केले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रबाडाने एकाच षटकात दिले दोन धक्के –
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांचा अनुभवी गोलंदाजी कागिसो रबाडाने सार्थ ठरवला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला एकाच षटकात दोन धक्के बसले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबूशेन ही जोडी मैदानावर आली होती. ज्यांनी सुरुवातीला बरेच चेंडू खेळण्याऐवजी मागे सोडून धन्यता मानली. मात्र, कागिसो रबाडाने फलंदाजांना चेंडू खेळण्यास भाग पाडले.
उस्मान ख्वाजा खाते उघडण्यात अपयशी –
Kagiso Rabada delivers big time for South Africa with two wickets in an over 🔥
Catch the action live on our official broadcasters here ➡ https://t.co/oas2Rsdptj#Cricket #CricketReels #WTC25 pic.twitter.com/I9vOR8nCup
— ICC (@ICC) June 11, 2025
दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या डावातील ७ वे षटक निर्णायक ठरले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कागिसो रबाडाने उस्मान ख्वाजाला २० चेंडू खेळल्यानंतर खातेही उघडू दिले नाही. रबाडाने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू टप्पा पडताच आत आला आणि बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या डेव्हिड बेडिंघमकडे गेला. त्याने कोणतीही चूक न करता उतकृष्ट झेल टिपला. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला १२ धावांवर पहिला धक्का बसला.
हेही वाचा –Rohit Sharma : रोहितचे एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात ?
कॅमरून ग्रीनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का –
त्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कॅमरून ग्रीन (४) बाद होऊन माघारी परतला. ग्रीनने पहिल्या चेंडूवर लेग साईडला चौकार लगावला, पण तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. रबाडाचा चेंडू बॅटच्या कडेला लागून दुसऱ्या स्लिपमध्ये गेला, जिथे एडन मार्करमने अचूक डाइव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघाला १६ धावांवर दुसरा धक्का बसला.
हेही वाचा – WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दक्षिण अफ्रिकेची प्लेइंग 11 जाहीर
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या २५ षटकानंतर ४ बाद ७८ धावा आहे. कारण मार्नस लाबुशेन ५६ चेंडूत १७ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याला मार्को यान्सेनने झेलबाद केले. त्याच्यानंतर स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड पण मार्को यान्सेनच्या जाळ्यात अडकला. तो १३ चेंडूत ११ धावा काढून झेलबाद झाला. त्यामुळे पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले म्हणले तर चुकीचं ठरणार नाही. सध्या स्टीव्हन स्मिथ (१७) आणि ब्यू वेबस्टर (०) हे ऑस्ट्रेलिया संघाला पुनरागमन करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत.





