WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या

१. दीप्ती शर्मा
दीप्ती शर्मा (बेस प्राइस ५० लाख) ऑक्शनमध्ये उतरताच दिल्ली कॅपिटल्सने तिच्यावर पहिली बोली लावली. नंतर, बोली वाढत जाऊन दिल्लीने थेट ३.२० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. यूपी वॉरियर्सने याच रकमेवर आरटीएम कार्ड वापरले. हा आरटीएमचा वापर यूपी वॉरियर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि दीप्ती शर्मा पुन्हा त्यांच्या संघात सामील झाली. यासह दीप्ती शर्मा डब्ल्यूपीएल ऑक्शनच्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील सर्वात महागडी खेळाडू बनली.
२. अमेलिया केर
After the end of three sets, here are the top buys so far in WPL 2026 Auction.
Deepti Sharma still on the top at 3.20 crore.
📸: Jio Hotstar#DeeptiSharma #WPL2026 #WPL2026Auction pic.twitter.com/S7rK28PoDY
— CricTracker (@Cricketracker) November 27, 2025
न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केरला मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी रिलीज केले होते. तिने स्वतःची बेस प्राइस ५० लाख रुपये ठेवली होती. ऑक्शन सुरू होताच यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात केरला विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. काही वेळातच किंमत १ कोटींच्या पुढे गेली आणि अखेरीस मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना तिला विकत घेत बाजी मारली. बेस प्राइसपेक्षा सहापट अधिक किंमत मुंबईने केरसाठी मोजली.
हेही वाचा – PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO
३. शिखा पांडे
ऑक्शनमध्ये शिखा पांडेचे नाव येताच, आरसीबी आणि यूपी वॉरियर्सने तिला विकत घेण्यासाठी मोठी बोली लावली. आरसीबीने २.२ कोटी रुपयांपर्यंत बोली लावत शिखाला मिळवण्याचा प्रयत्न केला, पण यूपी वॉरियर्सने २.४ कोटी रुपये मोजून तिला आपल्या ताफ्यात सामील केले.
𝐀𝐥𝐥 𝐋𝐨𝐜𝐤𝐞𝐝 𝐈𝐧 🔒
Presenting the squads for #TATAWPL 2026 🔥
How does your favourite team stack up after the #TATAWPLAuction? 🤔@DelhiCapitals | @Giant_Cricket | @mipaltan | @RCBTweets | @UPWarriorz pic.twitter.com/I2H01eqNgQ
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 27, 2025
४. सोफी डिव्हाईन
न्यूझीलंडची स्टार सोफी डिव्हाईनसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यात जोरदार लढत झाली. मात्र गुजरात जायंट्सने अखेर बाजी मारली. शिखा पांडेसाठी गुजरात जायंट्सने २ कोटी मोजत आपल्या संघात सामील करुन घेतले.
हेही वाचा – WPL 2026 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली
५. मेग लॅनिंग
दिल्ली कॅपिटल्सला दोनदा फायनलमध्ये पोहोचवणारी कर्णधार मेग लॅनिंग हिला यूपी वॉरियर्सने १.९० कोटी रुपयांना विकत घेतले, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला.





