Meg Lanning Record : मेग लॅनिंगचा ऐतिहासिक पराक्रम! डब्ल्यूपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली तिसरी फलंदाज

Meg Lanning Record in WPL : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या ७ व्या सामन्यात यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लॅनिंग हिने फलंदाजीला उतरताच क्रिकेट विश्वात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अवघ्या ४ धावा पूर्ण करताच लॅनिंगने डब्ल्यूपीएलच्या इतिहासात आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. यासह तिने एक खास पराक्रमही केला आहे.
हा पराक्रम करणारी तिसरी फलंदाज –
महिला प्रीमियर लीगमध्ये १००० धावांचा टप्पा पार करणारी मेग लॅनिंग ही जगातील केवळ तिसरी फलंदाज ठरली आहे. विशेष म्हणजे, कालच मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने हा टप्पा गाठला होता आणि त्यानंतर २४ तासांच्या आत लॅनिंगनेही या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
1⃣0⃣0⃣0⃣ #TATAWPL runs…and counting 🙌@UPWarriorz captain Meg Lanning becomes only the 3⃣rd player to achieve the feat 🫡
Updates ▶️ https://t.co/4vXszSqbQO #KhelEmotionKa | #UPWvDC pic.twitter.com/NzjHWvdfiw
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 14, 2026
महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाज:
- नेट सायव्हर-ब्रंट: ११०१ धावा
- हरमनप्रीत कौर: १०१६ धावा
- मेग लॅनिंग: १०००* धावा
- एलिस पेरी: ९७२ धावा
- शफाली वर्मा: ८८७ धावा
हेही वाचा – Rohit Sharma Record : रोहित शर्माचा आशियात ‘विराट’ पराक्रम! ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत पटकावलं स्थान
यूपी वॉरियर्ससाठी पहिलेच वर्ष –
Innings Break!
Impressive knocks from Meg Lanning and Harleen Deol 🙌
But #DC pull things back well 👌The chase coming up soon! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/4vXszSqbQO #TATAWPL | #KhelEmotionKa | #UPWvDC | @UPWarriorz pic.twitter.com/LRPwzz1cK4
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 14, 2026
३३ वर्षीय मेग लॅनिंगने यापूर्वीचे तिन्ही हंगाम दिल्ली कॅपिटल्सकडून खेळले होते. मात्र, २०२६ च्या हंगामात ती यूपी वॉरियर्स (UPW) संघाचे प्रतिनिधित्व करत असून संघाचे नेतृत्वही करत आहे. या सामन्यात युपीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर किरण नवगिरे खाते न उघडता पहिल्याच षटकात बाद झाली, मात्र त्यानंतर लॅनिंगने जबाबदारीने फलंदाजी करत आपला वैयक्तिक विक्रम पूर्ण केला.
हेही वाचा – Virat Kohli Record : पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत विराटने रचला इतिहास! सचिनला मागे टाकत ठरला पहिलाच खेळाडू
या सामन्यात यूपी वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५४ धावांचे लक्ष्य उभा केले आहे. संघाची कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ५४ धावांचे योगदान दिले. तिने आपल्या या खेळीत ९ चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याचबरोबर हरलीन देओल ३६ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ४७ धावांचे योगदान देऊन रिटायर्ड ऑउट झाली. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून गोलंदाजी करताना मारिझॅन काप आणि शफाली वर्मा यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.





