PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO

PM Modi Meets India Womens Blind Cricket Team : भारतीय दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने नेपाळला हरवून महिला ब्लाइंड टी-२० विश्वचषक २०२५ चा पहिलाच खिताब जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ७ विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांचा उत्साह वाढवला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खेळाडूंकडून ‘साइन’ केलेली बॅट भेट –
पंतप्रधान मोदींना भेटताना, संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी (Signed) केलेली क्रिकेट बॅट भेट म्हणून दिली. यानंतर, पंतप्रधान मोदींनीही एका चेंडूवर आपली स्वाक्षरी केली आणि खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले.
प्रधानमंत्री @narendramodi ने टी-20 विश्व कप जीतने वाली महिला दृष्टिबाधित क्रिकेट टीम से मुलाकात की।@PMOIndia #PMModi #WomenInSports #T20WorldCup pic.twitter.com/8jI8RBUGID
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) November 27, 2025
विजयानंतर पंतप्रधानांनी केले होते अभिनंदन –
भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे संघाचे अभिनंदन केले होते. त्यांनी लिहिले होते: “पहिला महिला ब्लाइंड टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल टीमचे अभिनंदन. याहून अधिक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिल्या. ही खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक यश आहे. खेळाडूंनी कठोर परिश्रम, सांघिक कार्य आणि दृढनिश्चयाचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे. प्रत्येक खेळाडू चॅम्पियन आहे. संघाला त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा. ही कामगिरी पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल.”
हेही वाचा – WPL 2025 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली
देशात झाले जोरदार स्वागत –
महिला ब्लाइंड टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर जेव्हा भारतीय संघ मायदेशी परतला, तेव्हा चाहत्यांनी त्यांचे जोरदार आणि उत्साहाने स्वागत केले. विमानतळावर चाहते झेंडे घेऊन उभे होते आणि संपूर्ण वातावरण जल्लोषाने भरलेले होते. हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद होता.
भारताचा दणदणीत विजय –
महिला ब्लाइंड टी-२० विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात नेपाळ संघाने प्रथम फलंदाजी करताना ११४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने १२ षटकांतच हे लक्ष्य सहज गाठले. ब्लाइंड महिला टी-२० विश्वचषकाचे हे पहिलेच आयोजन होते आणि भारताने पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी जिंकली. भारतीय संघासाठी फुला सरेन हिने नाबाद ४४ धावा केल्या, तर करुणा हिने २७ चेंडूत ४२ धावा केल्या होत्या. यापूर्वी, भारताने सेमीफायनलमध्ये मजबूत ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला होता.





