Amelia Kerr Record : अमेलिया केरने रचला इतिहास! महिला प्रीमियर लीगमध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारी पहिलीच खेळाडू

२० व्या षटकात केला धमाका –
3️⃣ wickets in the 20th over ➡️ 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢𝐊𝐄𝐑𝐑’s 5️⃣0️⃣th wicket in 𝐁𝐥𝐮𝐞 & 𝐆𝐨𝐥𝐝💙 pic.twitter.com/pAPpodYbqg
— Mumbai Indians (@mipaltan) January 17, 2026
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर यूपी वॉरियर्सविरुद्धच्या डावातील २० व्या षटकात अमेलियाने आपली जादू दाखवली. तिने या एकाच षटकात ३ गडी बाद केले:
- पहिल्या चेंडूवर हरलीन देओलला यष्टीचीत (Stump out) केले.
- चौथ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनला माघारी धाडले.
- डावाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ति शर्माला बाद करून तिने आपला ५० वी विकेट्स पूर्ण केली.
अमेलियाने ४ षटकांत २८ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी घेतले. या कामगिरीसह तिने ३४ सामन्यांत ५० विकेट्सचा आकडा गाठला आहे.
डब्ल्यूपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाज:
| खेळाडू | संघ | सामने | बळी |
| अमेलिया केर | मुंबई इंडियन्स | ३४ | ५० |
| हेली मॅथ्यूज | मुंबई इंडियन्स | ३१ | ४३ |
| सोफी एक्लेस्टोन | यूपी वॉरियर्स | ३० | ४० |
| नॅट सायव्हर-ब्रंट | मुंबई इंडियन्स | ३३ | ३९ |
| शिखा पांडे | दिल्ली/यूपी | ३२ | ३३ |
हेही वाचा – टी-२० विश्वचषकासाठी तगड्या संघाची घोषणा! ४२ वर्षीय खेळाडू बनला कर्णधार; जसप्रीतलाही मिळाली संधी
पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल –
या शानदार कामगिरीनंतर अमेलिया केरने डब्ल्यूपीएल २०२६ च्या ‘पर्पल कॅप’वर (Purple Cap) कब्जा केला आहे. ५ सामन्यांत १० विकेट्स ती या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सची नंदनी शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.





