Deepti Sharma Records : दीप्ती शर्माने रचला नवा इतिहास! पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्स घेत लावली विक्रमाची रांग; रेणुका-झुलनलाही टाकलं मागे
Deepti Sharma Records : भारताच्या या ऐतिहासिक विजयाची मुख्य शिल्पकार ठरली ती स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा. तिने अवघ्या १० धावा देत ५ विकेट्स घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले.

Deepti Sharma 5 Wickets Records against Pakistan : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव करत स्पर्धेत दणदणीत सुरुवात केली आहे. १४ जून रोजी बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर वर्चस्व गाजवले. भारताच्या या ऐतिहासिक विजयाची मुख्य शिल्पकार ठरली ती स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा. तिने अवघ्या १० धावा देत ५ विकेट्स घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. यासह तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली. Deepti Sharma Records
दीप्ती शर्माने रचला नवा इतिहास – (Deepti Sharma Records)
दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध ४ षटकांत केवळ १० धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. यासह ती महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे. या भारतीय ऑफ-स्पिनरच्या नावावर १६६ विकेट्स आहेत. दीप्तीने आपल्या कारकिर्दीत १४५ सामने खेळले आहेत. थायलंड महिला संघाच्या थिपाचा पुत्थावोंगच्या नावावर १६५ विकेट्स आहेत. पूर्ण सदस्य संघांमधील गोलंदाजांमध्ये, ऑस्ट्रेलियाची मेगन शट १५२ विकेट्स दीप्तीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दीप्तीने मोडला दिग्गज झुलन गोस्वामीचा विक्रम – (Deepti Sharma Records)
HISTORY CREATED! 🇮🇳🔥
Deepti Sharma now stands alone at the top with 166 wickets, becoming the leading wicket-taker in Women’s T20Is. 🏏👑
Take a bow, champion! 🙌#DeeptiSharma #INDvsPAK pic.twitter.com/x2fpyNS9CJ
— Aarushi Beniwal (@AarushiBeniwal) June 15, 2026
तसेच महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर होता. तिने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. महिला टी२० विश्वचषकातील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. रेणुका ठाकूर आणि प्रियांका रॉय यांच्यानंतर, दीप्ती टी-२० विश्वचषकात पाच विकेट्स घेणारी तिसरी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. रेणुकाने २०२३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५ धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या, तर प्रियांका रॉयने २००९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १६ धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
टी-२० विश्वचषकातील भारताचा पाचवा सर्वात मोठा विजय – (Deepti Sharma Records)
4️⃣ overs
1️⃣0️⃣ runs
5️⃣ WICKETS 💥𝗔𝗯𝘀𝗼𝗹𝘂𝘁𝗲𝗹𝘆 𝗽𝗵𝗲𝗻𝗼𝗺𝗲𝗻𝗮𝗹 from Deepti Sharma who records her career-best T20I bowling figures 🫡
Scorecard ▶️ https://t.co/1tfRc3jcrX#TeamIndia | #WomenInBlue | #T20WorldCup | @Deepti_Sharma06 pic.twitter.com/LmgXXfZ5kM
— BCCI Women (@BCCIWomen) June 14, 2026
धावांच्या फरकाने विचार केला तर, पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला हा विजय भारताचा विश्वचषक इतिहासातील पाचवा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर २०२४ मधील श्रीलंकेविरुद्धचा ८२ धावांचा विजय आहे. या विजयामुळे भारताने ग्रुप-ए च्या गुणतालिकेत २ गुणांसह आणि +३.२०० या भक्कम नेट रनरेटसह दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया २ गुणांसह आणि +३.२५० रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. Deepti Sharma Records





