कंबोडियात बनणार जगातील सर्वात उंच बुद्धमूर्ती; तीस मजली इमारतीएवढी असणार सोन्याच्या मूर्तीची उंची

नोम पेन्ह – कंबोडियात जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती तयार केली जाणार आहे ही मूर्ती संपूर्ण शुद्ध सोन्याची असणार असून उंची 100 मीटर म्हणजेच एखाद्या 30 मजली इमारतीच्या उंची एवढी या मूर्तीची उंची असणार आहे. कंबोडियातील पर्यटन क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती सोक कोंग यांनी ही योजना तयार केली, असून त्यांनी नुकतीच या योजनेची माहिती जाहीर केली आहे. हा बुद्ध मूर्तीचा पूर्ण प्रकल्प 34 दशलक्ष पाउंड म्हणजेच 3000 कोटी रुपयांचा आहे. पंतप्रधान होन सेन यांनी सुद्धा या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
कंबोडियातील प्रसिद्ध बोकोर पर्वतरांगावर ही मूर्ती उभारण्यात येणार असून ही मूर्ती लांब अंतरावरून सुद्धा पर्यटकांना दिसणे शक्य होणार आहे. उद्योगपती सोंग यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती पंतप्रधानांना दिली यावेळी त्यांनी त्याचे डिजिटल प्रेझेंटेशनही केले आणि ही मूर्ती कशा प्रकारे दिसेल याचेही सादरीकरण केले.
ते पंतप्रधानांना पसंद पडल्याने त्यांनी लगेच या प्रोजेक्टला मान्यता दिली सोंग हे कंबोडियातील सर्वात यशस्वी उद्योगपती मानले जातात त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही सर्वात उंच बुद्ध मूर्ती जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेच शिवाय बुद्ध तत्त्वज्ञान मानणाऱ्या जगाच्या पाठावरील कोट्यावधी लोकांसाठी तो धार्मिक विषयही ठरणार आहे कंबोडियातील काही बौद्ध विचारवंतांना मात्र ही पैशाची उधळपट्टी वाटत आहे.
पण काही लोकांच्या मध्ये मात्र बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प गरजेचेच आहेत. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 46 मीटर उंच आहे त्यापेक्षा जवळजवळ दुप्पट म्हणजे 100 मीटर उंचीची सोन्याची बुद्धमूर्ती निश्चितच कंबोडियाकडे पर्यटकांचा ओघ वाढवण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.





