जगातील सर्वात जुन्या जहाजाचा लागला शोध; तब्बल ३३०० वर्षांपूर्वीचा सापडला खजिना

जेरुसलेम : समुद्राच्या आत अनेक रहस्ये दडलेली असतात. समुद्रात बऱ्याच वेळा खजिना सापडण्याचा घटना घडल्या आहेत. आता समुद्राच्या पोटात दडलेला 3300 वर्षांपूर्वीचा खजिना सापडला आहे. समुद्रात खोलवर एका खूप जुन्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. हे जहाज इस्रायलच्या समुद्र किनाऱ्यापासून उत्तरेला तब्बल 2000 मीटर खोल समुद्रात सापडले आहे. या जहाजाच्या ढिगाऱ्यात खजिना सापडला आहे.
या प्रकारच्या जहाजाला एम्फोरा नावाने ओळखले जाते. एम्फोरा हे एक विशेष प्रकारचे जहाज आहे. यामध्ये वाइन किंवा तेल सारखे द्रव ठेवता येते. यामध्ये दोन्ही बाजूंना धरण्यासाठी हँडल देखील असतात. भारतात पुडुचेरीतील अरिकामेडू येथे भूमध्य प्रदेशातदेखील एम्फोरा सारखी जहाजे सापडली आहेत.इस्रायलच्या समुद्र किनाऱ्यापासून 90 किमी लांब हे जहाज सापडलं आहे. या जहाजाचा आकार 40 फूट असून ते कांस्य युगातील असल्याची माहिती आहे.
या जहाजाला गेल्यावर्षी एका गॅस कंपनीने समुद्रात रोबॉटच्या मदतीने सी स्कॅनिंगदरम्यान शोधले होते. भूमध्य समुद्रात इतक्या खोलवर सापडलेले हे सर्वात जुने जहाज आहे.हे जहाज समुद्री वादळ किंवा कुठल्या तरी समुद्री चाच्यांच्या हल्ल्यात बुडाला असावं, अशी शक्यता शोधकर्त्यांनी वर्तवली आहे. तरी हा शोध खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
हा जागतिक स्तरावर इतिसाहाला बदलणारा शोध असू शकतो. हे जहाज संकटात असताना बुडाल्याचं दिसून येत आहे. हे एकतर वादळामुळे बुडाले असेल किंवा चाचेगिरीच्या प्रयत्नांमुळे बुडालं असावं या जहाजाचे अवशेष जमिनीपासून 90 किमी अंतरावर अजूनही पाण्याखाली आहेत. हे एम्फोरा जहाज समुद्रातून तेल, मद्य आणि फळं वाहून नेण्यासाठी वापरले जात असे.





