रायगडमध्ये आढळलेल्या संशयित बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर; नेमकं काय झाले स्पष्ट?

Suspicious Boat | रायगडातील कोर्लई समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेल्या बोटीमुळे संभ्रम निर्माण झाला होता. पाकिस्तानमधून ही बोट भारतात आल्याचे म्हटले जात होते. आता या बोटीसंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. तटरक्षक दलाच्या रडारवर रविवारी रात्री दिसलेली संशयास्पद बोट नसून तो जिपीएस ट्रॅकर असलेला जाळीचा बोया असल्याची बाब तटरक्षक दलाच्या पाहणीत समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकद्दर बोया 99 असे या मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाकिस्तानी बोटीचे नाव आहे. मच्छीमार, कोळीबांधव जेव्हा मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात, तेव्हा जाळी बुडून जाऊ नये यासाठी फ्लोटींग बोयाचा वापर केला जातो. हा फ्लोटींग बोया पाकिस्तानहून भारतीय समुद्र हद्दीत वाहून आलेला आहे.
जीपीएस ट्रॅकर
सबंधित बोट ही पाकिस्तानच्या कराचीमध्येच आहे. मासेमारी बोटीचा बोया असल्याने त्याला जीपीएस ट्रॅकर आहे. या ट्रॅकरमुळेच भारतीय नौदलाने बोटीची ओळख पटवली आहे. मात्र मूळ बोट पाकिस्तानात असून बोटीचा काही अवशेष भारतात वाहून आल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, ही बोट खोल समुद्रात असल्याचे सांगितले गेले. रायगड पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी तातडीने प्रतिसाद दिला. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने समुद्रात शोध घेण्यात आला. तपासादरम्यान ‘मुकद्दर बोया 99’ नावाची पाकिस्तानी मासेमारी बोट रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. ही बोट वादळामुळे पाकिस्तानमधील कराचीकडून भारतीय जलसीमेत वाहून आल्याचा अंदाज नौदलाने वर्तवला आहे. Suspicious Boat |
दरम्यान, ही बोट भारतीय हद्दीत दिसताच यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. यासाठी 600 पोलिसांनी संपूर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला. मात्र आता तटरक्षक दलाच्या शोधमोहीमेत खुलासा करण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
हेही वाचा:
पाटण्यात एन्काऊंटर…! गोपाल खेमका हत्याकांडासाठी शस्त्रे पुरवणारा पोलिसांच्या चकमकीत ठार




