Raigad : रायगडमध्ये बोट बुडाल्याने खलाशाचा मृत्यू; ३ मच्छीमार बेपत्ता

Raigad – उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर पाटील यांच्या मालकीची तळजाई नावाची मच्छीमारी बोट खांदेरी किल्ल्याजवळ पलटी होवून काही मच्छीमार कामगार बचावले तर तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची घटना ताजी असतानाच उरण तालुक्यात मोरा या समुद्र किनारी एक बोट बुडाल्याने एक परप्रांतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उरणच्या मोरा समुद्र किनारी एक बोट बुडाली असून, यातील एका परप्रांतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. वादळी हवामानामुळे प्रवाशी वाहतूक बंद केली असून, मासेमारीसाठीही बंदी असताना देखील बोटी समुद्राच्या पाण्यात बिनधास्तपणे मासेमारी करत आहेत.
मात्र याची माहिती येथील मत्स्यव्यावसाय अधिकारी तसेच बंदर अधिकारी यांना नसल्याने अशा प्रकारचे अपघात होऊन जीवितहानी होण्याचे प्रकार सारखे घडत असल्याचे दिसून येत आहेत.





