पुणे- पुणे -आळंदी रस्त्यावरील काळे पेट्रोल पंपाजवळ चोवीसावाडी येथील शुभंकरोती सोसायटीच्या सांस्कृतिक महिला कमिटीच्या महिलांनी नवरात्रीनिमित्त ‘बाई पण भारी देवा’या गीतावर सुंदर असे नृत्य बसवले आहे.
‘बाई पण भारी देवा’ गीतावर महिलांचे सुंदर नृत्य pic.twitter.com/z5V0XKGJmx
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 23, 2023
महिला सांस्कृतिक कमिटीच्या अध्यक्ष तृप्ती संतोष टकले यांनी महिलांचा ग्रुप तयार करून महिलांनी कसे जगावे, यावर बाईपण भारी देवा या सिनेमाला अनुसरून माहिती दिली. या नृत्याच्या माध्यमातून समाजाला तसेच सोसायटीतील सर्व महिला व पुरुषांना एक चांगला विधायक संदेश दिला. हा आगळा वेगळा महिलांनी महिलांचे कौतुक व सन्मान करणारा प्रबोधनाचा उपक्रम तृप्ती संतोष टकले व त्यांची पूर्ण टिम वेगवेगळ्या ठिकाणी सादर करणार आहेत.
शुभंकरोती सोसायटी, महिला ग्रुपच्या तृप्ती टकले (अध्यक्ष),नलिनी सुरगुडे (समालोचक), नलिनी चांदणे, स्नेहल जाधव, राजश्री गाडीवान, शुभ्रा सुतार, स्वाती कोरे, वृषाली बोयाने, मोनाली पेटकर, स्वाती दाते, जयश्री माळी, सोनाली माने, रुपाली बोरसे या ग्रुपने महिलांनी कसे जगावे यावर हा कार्यक्रम सादर करून सर्व महिलांची मने जिंकली आहेत.