BBL 2025 : बिग बॅश लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा पहिला ड्राफ्ट जाहीर, भारताकडून हरमनप्रीत कौरसह 3 क्रिकेटपटूंचा समावेश…

Big Bash League 2024-25 : बिग बॅश लीगच्या आगामी हंगामाचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे, ज्यामध्ये ही स्पर्धा 15 डिसेंबरपासून सुरू होईल तर अंतिम सामना 27 जानेवारी रोजी खेळवला जाईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला बिग बॅश लीग आणि पुरुष बिग बॅश लीग या दोन्हीच्या खेळाडूंच्या मसुदा प्रक्रियेतील (प्लेयर्स ड्रॉफ्ट प्रक्रिया) पहिल्या सेटमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पहिल्या दोन्ही सेटमध्ये 10-10 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. प्लेअर्स ड्राफ्ट 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. बिग बॅश लीग स्पर्धेचं हे दहावं पर्व आहे. खेळाडूंसाठी प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रान्झ श्रेणी असा मसुदा तयार केला आहे.
JUST IN: The first player nominations have dropped for the #BBL14Draft 👀 #BBL14 pic.twitter.com/1VdGMqIkW8
— KFC Big Bash League (@BBL) August 19, 2024
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफलाही पुरुष खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज शादाब खान आणि वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांनाही प्लेअर्स ड्राफ्टमध्ये स्थान मिळाले आहे.
So much talent 🤩
The first player nominations for the #WBBL10Draft have dropped! #WBBL10 pic.twitter.com/oEwHMKwzQv
— Weber Women’s Big Bash League (@WBBL) August 19, 2024
दुसरीकडे भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा व्यतिरिक्त, जेमिमाह रॉड्रिग्जला ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या महिला बिग बॅश लीगच्या आगामी 10 व्या हंगामातील खेळाडूंच्या मसुद्यात (प्लेअर्स ड्राफ्ट) स्थान मिळाले आहे. हरमनप्रीत कौर सध्या मेलबर्न रेनेगेड्स संघाचा भाग आहे, त्यामुळे तिच्या संघाला देखील मसुदा प्रक्रियेत हरमनप्रीतला पुन्हा त्यांच्या संघात समाविष्ट करण्याची संधी असेल.
बीबीएल मेन्स प्लेयर ड्रॉफ्टमधील खेळाडू – लॉरी इवांस (पर्थ स्कॉर्चर्स), लॉकी फर्ग्यूसन, एलेक्स हेल्स (सिडनी थंडर), शमर जोसेफ, शादाब खान, जेमी ओवरटन (एडिलेड स्ट्राइकर्स), हारिस रउफ (मेलबर्न स्टार्स), जेसन रॉय, मुजीब उर रहमान (मेलबर्न स्टार्स), जेम्स विंसे (सिडनी सिक्सर्स).
बीबीएल वुमन्स प्लेयर ड्रॉफ्टमधील खेळाडू – सुजी बेट्स (सिडनी सिक्सर्स), एलिस कॅप्सी (मेलबर्न स्टार्स), सोफी एक्लेस्टोन (सिडनी सिक्सर्स), शबनम इस्माइल (होबार्ट हरिकँस), हरमनप्रीत कौर (मेलबर्न रेनेगेड्स), हीथर नाइट (सिडनी थंडर), जेमिमा ऱॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, लॉरा वोल्वार्ड्ट (एडिलेड स्ट्राइकर्स), डॅनी व्याट (पर्थ स्कॉर्चर्स).





