Paris Olympics 2024 (Tennis) : पहिल्या फेरीतील पराभवासह नागल पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर…

Paris Olympics 2024 (Tennis Men’s Singles Round 1) : भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलच्या हाती निराशा लागली आहे. एकेरीत आव्हान देण्यासाठी आलेल्या नागलला अडीच तास चाललेल्या लढतीत फ्रान्सच्या कोरेन्टिन माउटेटकडून 6-2, 2-6, 5-7 असा पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवासह तो पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. यासह टेनिस एकेरीत भारताची मोहीम संपुष्टात आली आहे.
आज म्हणजेच रविवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी, भारतीय टेनिसपटू सुमित नागलचा पहिल्या फेरीचा सामना फ्रान्सच्या कोरेन्टिन माउटेसोबत झाला. सुमित नागलचा हा पहिला फेरीचा सामना होता, ज्यामध्ये तो कोरेंटिनसमोर खूपच कमजोर दिसत होता. या सामन्यादरम्यान या दोन खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. तीन सेटपर्यंत चाललेल्या चुरशीच्या लढतीनंतर सुमित ऑलिम्पिक पुरुष एकेरीच्या टेनिस स्पर्धेतून बाहेर पडला.
Result Update: Tennis Men’s Singles Round 1👇
Indian ace @nagalsumit‘s #ParisOlympics2024 campaign comes to an end after losing 2-6, 6-2, 5-7 to France’s Corentin Moutet.
Keep your head high Sumit!! You fought well💪 @AITA__Tennis pic.twitter.com/OkaRG0ItWD
— SAI Media (@Media_SAI) July 28, 2024
भारताचा नंबर 1 असलेल्या या 26 वर्षीय खेळाडूने 2 तास 28 मिनिटे चाललेल्या या लढतीत आपले सर्वस्व पणाला लावले पण तो आपल्या प्रतिस्पर्ध्याशी टक्कर देऊ शकला नाही. पहिला सेट गमावल्यानंतर नागलने दुसरा सेट 6-2 असा जिंकला आणि सामना निर्णायक गेमपर्यंत पोहोचला पण शेवटच्या सेटमध्ये त्याला आपली कामगिरी पुढे चालू ठेवता आली नाही आणि त्यानं सामना गमावला.
Paris Olympics 2024 (Men’s 10m Air Rifle Event) : अर्जुन बाबूताची अंतिम फेरीत धडक..
या सामन्यात त्याने पहिला सेट 2-6 असा गमावला. यानंतर त्याने पुनरागमन करत दुसरा सेट 6-2 असा जिंकला. या सामन्यातील तिसऱ्या सेटमध्ये सुमित नागलला 5-7 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह फ्रान्सच्या या खेळाडूने पुढील फेरीसाठी जागा निश्चित केली आहे.





