Wimbledon Open 2024 : कोको गॉफची विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत धडक…

Wimbledon Open 2024 : द्वितीय मानांकित अमेरिकेची स्टार टेनिसपटू कोको गॉफने बुधवारी येथे रोमानियाच्या अँका टोडोनेचा पराभव करून विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅमच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. यूएस ओपन चॅम्पियन गॉफने 2019 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी ऑल इंग्लंड क्लबमध्ये पदार्पण करताना व्हीनस विल्यम्सचा पराभव केला होता.
तिने बुधवारी कोर्ट 1 वर टोडोनीचा 6-2, 6-1 असा पराभव केला. 19 वर्षीय टोडोनी हिचा ग्रँडस्लॅममध्ये पदार्पण सामना होता. विम्बल्डन 2024 च्या दुसऱ्या फेरीचा सामना जिंकण्यात अमेरिकेच्या कोको गॉफला कोणतीही अडचण आली नाही. गॉफने हा सामना सहज जिंकला.
पाच वर्षांपूर्वी, गॉफने पहिल्या फेरीत पाच वेळची विम्बल्डन चॅम्पियन व्हीनस विल्यम्सचा 6-4, 6-4 असा पराभव केला होता आणि अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. तिने तिच्या प्रत्येक ग्रँडस्लॅम पदार्पणात अंतिम 16 मध्ये प्रवेश केला आहे.
अमेरिकेची स्टार टेनिसपटू कोको गॉफ हिने कोर्टवर सांगितले की, “हे तेच कोर्ट आहे जिथे मी माझे पहिले विम्बल्डन सुरू केले. कोर्ट 1 माझ्यासाठी नेहमीच खास असेल.”





