Coco Gauff : कोको गॉफने रचला इतिहास! अर्यना सबालेंकाला धूळ चारत पटकावले पहिले फ्रेंच ओपन विजेतेपद

Coco Gauff Claims French Open 2025 Title : रोलाँ गॅरो येथे झालेल्या फ्रेंच ओपन २०२५ च्या महिला एकेरी फायनलमध्ये कोको गॉफने बाजी मारत इतिहास रचला आहे. तिने जगातील एक नंबरची अर्यना सबालेंकाला ६-७, ६-२, ६-४ अशा फरकाने थरारक सामन्यात पराभूत करून तिचे पहिले फ्रेंच ओपन आणि दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले. २१ वर्षीय अमेरिकन खेळाडूने पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमावल्यानंतर दमदार पुनरागमन केले आणि तिसऱ्या सेटमध्ये साबालेंकाची सर्व्हिस ब्रेक करत विजय मिळवला.
हा सामना २ तास ३८ मिनिटे चालला –
२१ वर्षीय गॉफने रोलँड गॅरोसच्या फिलिप चॅटियर कोर्टवर झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात बेलारूसच्या सबालेंकाचा पराभव केला. २ तास ३८ मिनिटे चाललेल्या सामन्यात गॉफने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या सबालेंकाचा पराभव करून इतिहास रचला. ती पहिल्यांदाच फ्रेंच ओपन विजेती ठरली आहे.
Coco 🤝 Iga
Dropping the lid on the RG trophy https://t.co/CqvpbGRSRQ
— 2x slam champion 🏆🏆 (@VenusGauff) June 7, 2025
शेवटच्या वेळी दोघी माद्रिद ओपनमध्ये आमनेसामने आल्या होत्या –
A New queen in Paris. 👑 @CocoGauff #RolandGarros pic.twitter.com/PRA0TMErjh
— Roland-Garros (@rolandgarros) June 7, 2025
सेमीफायनलमध्ये गॉफने स्थानिक वाइल्डकार्ड लॉइस बोइसनवर मात केली होती, तर सबालेंकाने चार वेळची विजेता इगा स्विएटेकला पराभूत केले होते. कोको गॉफ २०२२ मध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. या दरम्यान तिला इगा स्विएटेकने पराभूत केले. गॉफच्या कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. यापूर्वी तिने २०२३ मध्ये यूएस ओपन जेतेपद जिंकले होते. सबालेंका आणि गॉफ यांचा शेवटचा सामना मे महिन्यात माद्रिद ओपनमध्ये झाला होता, ज्यामध्ये सबालेंकाने विजयी मिळवला होता.
हेही वाचा – Ricky Ponting : बुमराह नाही, गिलच का सर्वोत्तम कसोटी कर्णधार? रिकी पॉन्टिंगने सांगितले कारण
याआधी सबालेंकाने ऑक्टोबरमध्ये स्विएटेकला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले होते. तिने या हंगामात तीन जेतेपदे जिंकली आहेत. तिचे तीन ग्रँड स्लॅम विजय हार्डकोर्टवर आहेत, ज्यात २०२३ आणि २०२४ मधील ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०२४ मधील यूएस ओपनचा समावेश आहे.





