French Open 2025 : गॉफचा धमाका, सबालेन्काचा दबदबा; दोघींमध्ये रंगणार फायनलचा थरार

French Open 2025 Finals Updates : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आर्यना सबालेन्का हिने फ्रेंच ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात तिने चार वेळा विजेती राहिलेल्या इगा स्विएटेकचा ७-६(१), ४-६, ६-० असा पराभव केला. विशेष म्हणजे सबालेन्का पहिल्यांदाच या ग्रँड स्लॅमच्या जेतेपदाच्या सामन्यात पोहोचली आहे. त्याचबरोबर, हा तिचा एकूण सहावा ग्रँड स्लॅम फायनल आहे.
अंतिम फेरीत सबालेन्का आणि गॉफ आमनेसामने –
अंतिम फेरीत सबालेन्काचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची अमेरिकन खेळाडू कोको गॉफशी होईल. महिला ग्रँड स्लॅम फायनलमध्ये या दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध भिडतील. कोको गॉफने फ्रेंच वाइल्ड कार्ड असलेल्या लोइस बोइसनचा ६-१, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. गॉफने पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
🎾🔥 World No. 1 #ArynaSabalenka ended #IgaSwiatek’s quest for 5th #RolandGarros crown: 7-6(1), 4-6, 6-0 in a semifinal thriller that lasted 2h19m.
😈Next up: a juicy final against world No. 2 #CocoGauff. It’s the 1st #FrenchOpen final in 10 yrs featuring the top two players. pic.twitter.com/bxMPvMOOmI
— CGTN Sports Scene (@CGTNSportsScene) June 6, 2025
उपांत्यपूर्व फेरीत सबालेंकाने झेंगचा केला होता पराभव –
२१ वर्षीय अमेरिकन खेळाडू यूएस ओपन (२०२३) नंतर तिचा दुसरा ग्रँड स्लॅम फायनल खेळणार आहे. मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत पॅरिस ऑलिम्पिक विजेत्या किन्वेन झेंगचा ७-६ (३), ६-३ असा पराभव करून सबालेंकाने उपांत्य फेरी गाठली. चार वेळा फ्रेंच ओपन विजेत्या इगा स्विएटेकने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा ६-१, ७-५ असा पराभव केला होता.
हेही वाचा – Shubman Gill Statement : ‘त्यांची कमी भरून काढणे कठीण पण हे…’, विराट-रोहितबद्दल गिल काय म्हणाला?
पुरुष एकेरीची उपांत्य फेरी –
पुरुष एकेरीची उपांत्य फेरी आज रात्री खेळवली जाईल. पहिल्या सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराझचा सामना इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीशी होईल. दुसऱ्या सामन्यात २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविचचा सामना जागतिक नंबर-१ जॅनिक सिन्नर सोशी होईल.





