Wimbledon 2025 : जोकोविचची पोटदुखीवर मात करत विजयी सलामी! झ्वेरेव-गॉफचा धक्कादायक पराभव

Wimbledon 2025 Novak Djokovic reach 2nd round : सर्बियाचा दिग्गज आणि महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने पोटाच्या समस्येवर मात करत चार सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात विजय मिळवून विम्बल्डन 2025 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, तीन वेळा ग्रँड स्लॅम फायनलिस्ट आणि तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव तसेच महिला गटातील दुसऱ्या मानांकित कोको गॉफ पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर झाले. जोकोविचला पहिल्या फेरीतील सामन्यादरम्यान पोटाच्या समस्येमुळे दोनदा डॉक्टरांची मदत घ्यावी लागली, तरीही त्याने अलेक्झांडर मुलरला 6-1, 6-7 (7), 6-2, 6-2 अशा फरकाने पराभव करत सामना जिंकला.
सामन्यानंतर नोव्हाक जोकोविच काय म्हणाला?
विक्रमी 24 वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेल्या नोव्हाक जोकोविचने सामन्यानंतर सांगितले, “मी 45 मिनिटे पोटाच्या समस्येने त्रस्त होतो, पण डॉक्टरांनी दिलेल्या चमत्कारिक गोळ्यांमुळे मी माझी ऊर्जा परत मिळवण्यात यशस्वी झालो.” ज्वेरेव्हला पहिल्या फेरीत 72व्या क्रमांकावरील आर्थर रिंडरक्नेचकडून पाच सेटच्या सामन्यात 4 तास 40 मिनिटांत 7-6 (3), 6-7 (8), 6-3, 6-7 (5), 6-4 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. रिंडरक्नेचचा ऑल इंग्लंड क्लबमधील करिअर रेकॉर्ड 1-4 असा आहे आणि तो ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 18 वेळा तिसऱ्या फेरीपुढे जाऊ शकला नाही.
Novak hasn’t lost a R1 match at #Wimbledon since his debut in 2005…
How many more? pic.twitter.com/iNgmVDLz3T
— Wimbledon (@Wimbledon) July 1, 2025
लॉरेन्झो मुसेटीचा पहिल्याच फेरीत पराभव –
गेल्या वर्षी विम्बल्डन आणि यंदाच्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचलेला सातव्या क्रमांकाचा खेळाडू लॉरेन्झो मुसेटीला यंदाच्या विम्बल्डनमध्ये पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याला निकोलोज बेसिलशविली याने पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 126व्या स्थानावर असलेला आणि या स्पर्धेत पात्रता फेरीतून प्रवेश मिळवलेला बेसिलशविली याने आपल्या मागील 31 ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये केवळ एकदाच चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली आहे.
हेही वाचा – IND vs ENG : यशस्वी जैस्वालने मोडला रोहित शर्माचा विक्रम, SENA देशांत ठरला अव्वल!
मंगळवारी उलटफेरांचे सातत्य कायम राहिले –
“It’s the win of her career.”
No.1 Court is stunned as Dayana Yastremska defeats No.2 seed Coco Gauff 7-6(3), 6-1 😲#Wimbledon pic.twitter.com/pZYylWHcs8
— Wimbledon (@Wimbledon) July 1, 2025
विम्बल्डन 2025 मध्ये मंगळवारी उलटफेरांचे सातत्य कायम राहिले. महिला एकल गटात खिताबाची प्रबल दावेदार मानली जाणारी कोको गॉफला पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. तिला दयाना यास्त्रेम्स्काने 7-6 (3), 6-1 अशा फरकाने हरवले. यासह विम्बल्डनच्या पहिल्या दोन दिवसांत 23 वरीयता प्राप्त खेळाडू (13 पुरुष आणि 10 महिला) दुसऱ्या फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलेल्या वरीयता प्राप्त पुरुष खेळाडूंमध्ये 18व्या क्रमांकाचे उगो हम्बर्ट, 27व्या क्रमांकाचे डेनिस शापोवालोव, 28व्या क्रमांकाचे अलेक्झांडर बुब्लिक आणि 30व्या क्रमांकाचे एलेक्स मिशेलसन यांचा समावेश होता.





