Muchova Wimbledon Final : झेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोव्हा अंतिम फेरीत दाखल! गतविजेत्या कोको गॉफला दाखवला बाहेरचा रस्ता
Muchova Wimbledon Final : कॅरोलिना मुचोव्हा या विजयासह, गेल्या ६ वर्षांत विम्बल्डनचे अंतिम तिकीट मिळवणारी ती चौथी झेक महिला ठरली आहे.

Karolina Muchova vs Coco Gauff Wimbledon 2026 Semifinal Result : विम्बल्डन २०२६ च्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरुवारी टेनिस विश्वाला थक्क करणारा थरार उलटफेर पाहायला मिळाला. झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाने एका अत्यंत अटीतटीच्या आणि रोमांचक टायब्रेकरमध्ये अमेरिकेच्या कोको गॉफचे विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आणले. मुचोव्हाने हा सामना ६-२, १-६, ७-६ असा जिंकत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
या विजयासह, गेल्या ६ वर्षांत विम्बल्डनचे अंतिम तिकीट मिळवणारी ती चौथी झेक महिला ठरली आहे. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना मुचोव्हा म्हणाली की, “ही एक मोठी लढाई होती आणि हा अनुभव एखाद्या रोलर-कोस्टर राईडसारखा होता.”
टायब्रेकरमध्ये थरार; गॉश चुकली, मुचोव्हा घसरली!
Imagine pulling off a diving volley in a match tie-break.
Karolina Muchova, that was incredible 😮💨 pic.twitter.com/frt6QFuaPZ
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2026
हा उपांत्य सामना शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत उत्कंठावर्धक राहिला. टायब्रेकरमध्ये गॉफकडे एका जोरदार पहिल्या सर्व्हिसनंतर मॅच पॉईंट मिळवण्याची संधी होती, मात्र तिने फोरहँड थेट नेटमध्ये मारल्यामुळे ती संधी गमावली. त्यानंतर मुचोव्हाला पहिला मॅच पॉईंट मिळाला, परंतु दुर्दैवाने गवतावर पाय घसरल्यामुळे तिने तो गमावला आणि गॉफचा शॉट तिच्या हातातून निसटला. या नाट्यमय घडामोडींनंतर मुचोव्हाने स्वतःला सावरत दुसरा मॅच पॉईंट मिळवला. गॉफने मुचोव्हाचे अनेक शॉट्स परतवून लावले, पण अखेर तिचा फोरहँड पुन्हा नेटवर आदळला आणि मुचोव्हाने विजयावर शिक्कामोर्तब केले. या ऐतिहासिक विजयानंतर मुचोव्हाने आश्चर्याने आणि आनंदाने आपला चेहरा हातांनी झाकून घेतला.
Karolina Muchova is into her first ever Wimbledon Final! 🙌
↳ Wimbledon. Every Match. Live & On Demand. Centre Court in 4K.#StanSportAU #Wimbledon pic.twitter.com/zG4Nquvwx5
— Stan Sport (@StanSportAU) July 9, 2026
“१० सेकंदात खेळ बदलला!” – मुचोव्हाची प्रतिक्रिया
Karolina Muchova was soaking in the history of Centre Court 🙏
↳ Wimbledon. Every Match. Live & On Demand. Centre Court in 4K.#StanSportAU #Wimbledon pic.twitter.com/2cGJKwfB3V
— Stan Sport (@StanSportAU) July 9, 2026
विजयानंतर अत्यंत भावुक झालेल्या नवव्या मानांकित मुचोव्हाने सांगितले की, “टेनिसच्या कोर्टवर अवघ्या १० सेकंदात परिस्थिती बदलते. तुमच्याकडे मॅच पॉईंट असतो आणि पुढच्याच क्षणी तुम्ही तो गमावता. अशा वेळी विचार करायला वेळच मिळत नाही, कोर्टवर प्रचंड तणाव असतो. मी अजूनही अक्षरशः थरथरत असून हा मोठा विजय पचवण्याचा प्रयत्न करत आहे.”
दुसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी शनिवारी लढत –
कॅरोलिना मुचोव्हाच्या कारकिर्दीतील हा दुसरा ग्रँड स्लॅम अंतिम सामना असेल. यापूर्वी ती २०२३ च्या फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये इगा स्वियाटेककडून पराभूत झाली होती. शनिवारी होणाऱ्या महामुकाबल्यात मुचोव्हाचा सामना झेक प्रजासत्ताकच्याच खेळाडूशी होण्याची शक्यता आहे; कारण दुसऱ्या उपांत्य सामन्यात लिंडा नोस्कोव्हाचा सामना युक्रेनच्या मार्टा कोस्त्युकशी होत आहे. मुचोव्हाच्या आधी झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा (२०२१ उपविजेती), मार्केटा वोंद्रोसोव्हा (२०२३ विजेती) आणि बार्बोरा क्रेज्सिकोव्हा (२०२४ विजेती) यांनी विम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.





