Bigg Boss 19 : बिग बॅास 19 मध्ये हा मराठमोळा कलाकार स्पर्धेक म्हणून सहभागी होणार? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा म्हणाला..

Bigg Boss 19 : येत्या २४ अॅागस्टपासून बिग बॅास १९ या रियालिटी शोच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र या शोची मोठी चर्चा सुरू आहे. नव्या पर्वाचा टीझरही चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या नव्या पर्वात बिग बॅासच्या घरात कोणते कलाकार स्पर्धेक म्हणून दाखल होणार याची चर्चाही सुरू आहे. अशातच आता सोशल मीडियावर या रियालिटी शोमध्ये मराठमोळा कलाकार स्पर्धेक म्हणून सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या सुरू असलेल्या चर्चांवर आता या अभिनेत्याने खुलासा केला आहे.
या मराठमोळ्या अभिनेत्याचं नाव उपेंद्र लिमये आहे. आता या अभिनेत्याने तो बिग बॅासच्या घरात सहभागी होणार आहे की नाही यावर प्रतिक्रिया देत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “मला अनेकांकडून असे विचारण्यात आले की, मी बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमाचा भाग होणार आहे का? तर आता स्पष्ट करू इच्छितो की, मी या शोचा भाग नाही. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद…” असं उमेंद्र लिमये यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
येत्या २४ अॅागस्टपासून बिग बॅास हिंदीचा नवा सीझन कलर्स मराठी या वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे. याशिवाय हा रियालिटी शो हॅाटस्टारवरही पाहायला मिळणार आहे. यंदाची बिग बॅासची थीम राजकारणावर आधारित असल्याची चर्चा असून, या शोसाठी चाहते आतुर झाले आहेत.
हेही वाचा : Pune News : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड; भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं





