Bigg boss 19 : गोंधळ, ड्रामा आणि मनोरंजनाचा स्फोट.! ‘बिग बॉस 19’ प्रीमियरची तारीख ठरली, पाहा स्पर्धकांची यादी

Bigg boss 19 | salman khan : ‘बिग बॉस’च्या 18 व्या सीझनचा अंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. करणवीर मेहराने सीझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तर विवियन डिसेना रनर अप ठरला. विशेष म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून बिग बॉसचं होस्टिंग अभिनेता सलमान खान करत आहे. त्याला चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद मिळतो.
सलमान खानने 2010 मध्ये ‘सीझन 4’ पासून हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली. मात्र, दरम्यानच्या काळात संजय दत्त, करण जोहर, अर्शद वारसी आणि अमिताभ बच्चन यांसारख्या इतर अनेक स्टार्सनीही हा शो होस्ट केला. पण चाहत्यांची पसंती नेहमीच सलमान खानच राहिला आहे.
अश्यातच, बिग बॉस संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस 19’ यंदा ऑक्टोबरमध्ये नाही तर 19 जुलैपासून सुरू होणार आहे, पण त्याची कोणीही पुष्टी केलेली नव्हती, मात्र आता ताज्या रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 19’ या सीझनची प्रसतावित तारीख समोर आली असून तो 3 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतो अशी चर्चा आहे.
मात्र असं असलं तरीही बिग बॉस 19 च्या प्रीमिअरच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण काही स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. यावेळी बिग बॉसच्या घरात अभिनेत्री डेझी शाह, तनुश्री दत्ता, फैजल शेख उर्फ फैजू, खुशी दुबे, विक्रम सिंह चौहान, राम कपूर, शशांक व्यास आणि लक्ष्य चौधरी यांच्या नावाचा समावेश आहे. पण या नावांची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
यंदाच्या सीजन मध्ये सीक्रेट खोली देखील असणार आहे, ज्यामध्ये काही नॉमिनेटेड स्पर्धकांना ठेवण्यात येईल. या खोलीचा संपूर्ण कन्ट्रोल हा सलमान खानच्या हातात असणार आहे. त्यामुळे ते बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या स्पर्धकांना पाहू शकतील. त्यामुळे यंदाचा ‘बिग बॉस’चा सीजन अतिशय दमदार असणार आहे.





