Supriya Sule : बारामती पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. अंतिम मुदतीच्या अवघ्या एका तास आधी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, या निर्णयानंतरही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून एकूण 23 उमेदवार आता रिंगणात आहेत. काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule )यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईत भेट घेतली होती. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. “तुम्ही हा प्रश्न अजित पवार गटाच्या वतीने विचारत असाल, तर त्याचे उत्तर माझ्याकडे तयार आहे,” असे म्हणत त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. Supriya Sule “माझी भूमिका मतदान करण्यापुरती आहे. शेवटी रिश्तेही मायने रखते है,” असे सांगत त्यांनी कुटुंबीय नातेसंबंधांना प्राधान्य दिले. तसेच बारामतीची निवडणूक बिनविरोध का झाली नाही, याबाबतचा प्रश्न अजित पवार गटालाच विचारावा, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली. Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या प्रचार करायला जाणार का? सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाल्या.. “मी काल दिवसभर बारामतीत नव्हते, त्यामुळे नेमके काय घडले याची माहिती नाही. मात्र, निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो,” असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. Supriya Sule यावेळी त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करत, “पैसा आणि सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणते, ‘रिश्ते मायने रखते है’,” असे सांगितले. तसेच सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी विठ्ठलावरील आपली श्रद्धा व्यक्त करत “राम कृष्ण हरी” असा भावनिक उच्चार केला. हेही वाचा : US Iran Talks Islamabad: “सी-१३० विमाने तैनात, दोन दिवसांची सुट्टी, सर्व मार्ग बंद” ; अमेरिका-इराणच्या चर्चेसाठी इस्लामाबादला किल्ल्याचे स्वरूप