Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनाला २ महिने पूर्ण, सुनेत्रा पवारांच्या मनात काहूर, भावुक पोस्टने वेधले लक्ष
Sunetra Pawar : २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झालेल्या अजित पवारांच्या स्मृतींना सुनेत्रा पवार यांनी उजाळा दिला.

Sunetra Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला होता. आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि सामान्य जनतेच्या मनात दादांच्या निधनाची मोठी पोकळी आहे. Sunetra Pawar
या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्या आठवणीत गुंतले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.Sunetra Pawar
अजित दादांच्या जागी काम करताना त्यांची उणीव पावलोपावली जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवारांचे विकासाभिमुख व्यक्तिमत्व, कामाची झपाटलेली वृत्ती आणि दूरदृष्टी हेच आपल्याला भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन करत राहील. Sunetra Pawar

Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनाला २ महिने पूर्ण, सुनेत्रा पवारांच्या मनात काहूर, भावुक पोस्टने वेधले लक्ष
दादा, केवळ नेते नव्हते, तर सामान्यांच्या आयुष्यात विश्वास निर्माण करणारे आधारस्तंभ होते. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेला राष्ट्रवादी परिवार त्यांच्याच प्रेरणेने पुढे चालत राहील, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावाना व्यक्त केला.
दुसरीकडे, या अपघाताचे गूढ अद्याप कायम असून आमदार रोहित पवार या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत स्पष्ट केले आहे की, जर हा अपघात घातपात असल्याचे निष्पन्न झाले, तर दोषींना सोडले जाणार नाही. दादांची स्वप्ने आणि विचार पुढे नेण्याचा निर्धार सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवला आहे. Sunetra Pawar





