Congress on Baramati Election: “बारामती पोटनिवडणूकीतून काँग्रेस माघार घेणार, निर्णय दिल्ली हायकमांडला कळवणार”
Congress on Baramati Election : विजय वडेट्टीवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज दुपारपर्यंत काँग्रेस उमेदवारी अर्ज माघार घेईल, अशी माहिती दिली.

Congress on Baramati Election : बारामती पोटनिवडणूकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे.
या भेटीत रोहित पवारांनी काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली आहे. यानंतर शरद पवार यांनी देखील बिनविरोध निवडणूक करण्याचा सल्ला काँग्रेसला दिला. याशिवाय सुनेत्रा पवार यांनीही सपकाळ यांना दोनदा फोन केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सपकाळ यांना फोन केल्याची माहिती आहे. Congress on Baramati Election
यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेईल, अशी माहिती दिली आहे. Congress on Baramati Election
“प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासोबत काल सर्वप्रमुख नेत्यांची चर्चा झाली, अनेकांनी आपली भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत व्यक्त केली. माघार घेतली पाहिजे अशी अनेकांची भूमिका होती. आता प्रदेशाध्यक्ष सर्व नेत्यांची भावना केंद्रीय श्रेष्ठींना कळवतील.
अजित पवार यांच्यावर नेता म्हणून आदर होता, हीच भावना बोलून दाखविली, यात हायकामंडचा निर्णय घेतल्यानंतर अंतिम निर्णय होईल, आमच्या मनात असलेले सांगितलं असून, परवानगी मिळाल्यानंतर दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याचा निर्णय होईल अशी शक्यता आहे,” असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. Congress on Baramati Election
दरम्यान, वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येत आहे. कारण दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर येण्याआधी वडेट्टीवार यांनी माघार घेणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा :
Sharad Pawar : बारामती पोटनिवडणूकीसाठी शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले “एका अपघाताने…”






